बेळगाव : सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बि.के. मॉडेल शाळा बेळगाव येथे शैक्षणिक विभागाकडून तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांने सहभाग घेतला होता. शालेय आणि केंद्रस्तरावर त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये किती चिट्ठी काढून एका विषयावर …
Read More »श्री. एल. के. कालकुंद्री “आदर्श सहकार रत्न” पुरस्काराने सन्मानित
बेळगाव : इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.) चि. बेळगाव व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन (रजि.) बेळगाव यांच्यातर्फे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातून जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमीत, या संस्थेचे संस्थापक श्री. एल. के. कालकुंद्री सर यांना राष्ट्रीय आदर्श सहकाररत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दि. 27 ऑक्टोबर …
Read More »आर्ट्स सर्कलचा दिवाळी पहाट कार्यक्रम
बेळगाव : आर्ट्स सर्कलचा दिवाळी पहाट कार्यक्रम मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी रामनाथ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. गायिका होत्या विदुषी अपूर्वा गोखले. पहाटे ठीक ६ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम खूप रंगला आणि श्रोत्यांची उत्स्फूर्त अशी दाद कलाकारांना मिळाली. सुरुवातीला मेधा मराठे ह्यांनी सर्वांचे स्वागत केले. अपूर्वा गोखले …
Read More »जुनी हुबळी दंगल प्रकरणी खटला मागे घेऊ नये : नागरिक हितरक्षण समितीची मागणी
बेळगाव : जुनी हुबळी येथील पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविणे, वक्फच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या राज्य सरकारच्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी आज बेळगावात नागरिक हितरक्षण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिक हितरक्षण समितीच्या वतीने जुनी हुबळी दंगल प्रकरणी सरकारने मागे घेतलेला खटला आणि …
Read More »बेळगाव महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी महत्वाची चर्चा
बेळगाव : बेळगाव महापालिकेची आज सर्वसाधारण सभा झाली. महापालिकेला येणे असलेली थकबाकी, भाडेपट्टी व महसूल वाढीबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. बेळगाव महापालिकेत आज महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. बेळगाव महानगरपालिकेच्या सभेच्या सुरुवातीला नुकतेच निधन झालेल्या नगरसेविका जरीना फतेखान यांचे पती खतल अहमद फतेखान …
Read More »भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनजागृती करावी : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी, कायदेशीर जागरूकता आणि जागृती आवश्यक आहे. भ्रष्टाचाराविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी न्याय आणि दोषींना शिक्षा होण्यास विलंब होत आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, पोलीस विभाग आणि कर्नाटक लोकायुक्त बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी …
Read More »मराठी भाषिकांनी आकाश कंदील आणि विद्युत रोषणाई बंद ठेवून निषेध नोंदवावा
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत आवाहन बेळगाव : आज मंगळवार दि. 29/10/2024 रोजी म. ए. युवा समितीची व्यापक बैठक युवा समिती कार्यालय, टिळकवाडी येथे आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर हे होते. 1956 पासून बेळगावसह 856 गावे महाराष्ट्रापासून तोडून तत्कालीन केंद्र सरकारने तत्कालीन म्हैसूर …
Read More »हलगा येथे राष्ट्रीय महामार्गावर तेल वाहतूक करणारा टँकर उलटला
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हलगा येथे पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला ओव्हरटेक करताना तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. मंगळवारी सकाळी ६.३० वा सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात झाला त्यावेळी टँकर हुबळीहून बेळगावच्या दिशेने येत होता. ट्रक …
Read More »काळ्या दिनाच्या जनजागृतीसाठी वडगाव, जुने बेळगाव विभाग बैठकीचे आयोजन
बेळगाव : काळ्या दिनाच्या जनजागृतीसाठी तसेच लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी वडगाव विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, महिला, युवा कार्यकर्ते यांच्यावती बुधवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वर मंदिर वडगाव येथे बैठकीचे आयोजन केले आहे. समिती आणि सीमालढ्यापासून दुर जाणाऱ्या युवकांना व नागरिकांना परत प्रवाहात …
Read More »विधानसभा म्हणजे चोरांचा अड्डा : शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर
बेळगाव : विधानसभा हा चोरांचा अड्डा बनला असून , शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप ऊस उत्पादक संघाचे नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केला. आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2023 मध्ये कर्नाटकात दुष्काळ पडला होता. यावेळी केंद्राच्या पिकांच्या नुकसानीमुळे राज्य सरकार अडचणीत आले असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta