बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील प्रणाली परशुराम हिंदरे या १४ वर्षीय बालिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू असल्याची माहिती मिळाली आहे. सदर बालिकेला रविवारी फक्त दोन वेळा उलट्या झाल्या आणि सोमवारी तिला ताप आला. प्रणालीच्या कुटुंबीयांनी तिला मंगळवारीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार न झाल्याने तिचा आज मृत्यू झाला. …
Read More »बेळगाव-कोल्हापूर महामार्गावर पाणी; वाहतुकीस अडथळा
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. हुक्केरी तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बेळगाव-कोल्हापूर महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर जादा पाणी आल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळजवळ हिरण्यकेशी नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. जास्तीचे पाणी शेतात आणि तेथून राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर …
Read More »गोकाक येथे घटप्रभा नदीला पूर; अनेकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात घटप्रभा नदीला पूर आल्याने 300 हून अधिक घरे, 150 हून अधिक दुकाने पाण्याखाली गेली आहेत, बाजारपेठ, दुकाने, रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. घरे, दुकाने, बेकरी, गॅरेज जलमय होऊन अराजकता …
Read More »पूर परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : सततच्या पावसामुळे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांतील अधिकाऱ्यांशी समन्वयाने काम करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. अतिवृष्टी आणि पूरस्थिती हाताळण्यासंदर्भात शुक्रवारी (ता. २६) जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी तहसीलदारांनी …
Read More »सुळगे – येळ्ळूर रस्त्याची दुरवस्था….
राजहंसगड : सध्या सुळगे – येळ्ळूर रस्त्याची अतिशय दयनीय0 अवस्था झाली आहे, रस्त्यावर ठीकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही व अपघात घडत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन डागडूजी करावी अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांतून होत …
Read More »अतिवृष्टीमुळे उद्याही शाळा – महाविद्यालयांना सुट्टी
बेळगाव : जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी (२७ जुलै) शाळा-पदवी पूर्व कॉलेजना सुट्टीची घोषणा केली आहे. रामदुर्ग तालुका वगळता सर्व तालुक्यांतील सर्व अंगणवाडी केंद्रे, शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि पूर्व पदवी महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केला …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षक कार्यशाळेचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने बेळगाव परिसरातील शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाटक व कथाकथन या माध्यमांचा मराठी अध्यापनात कशाप्रकारे वापर करावा हा या कार्यशाळेचा उद्देश होता. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर.पी.डी महाविद्यालयाचे मराठी विभाग …
Read More »माजी सैनिक संघटना संघटनेतर्फे कारगिल विजयोत्सव
बेळगाव : माजी सैनिक संघटना संघटनेने आज कुमार गंधर्व सभागृहात कारगिल विजय दिवसाचे स्मरण करून भारताच्या स्वाभिमानासाठी आणि सार्वभौमत्वासाठी लढणाऱ्या निर्भीड योद्ध्यांना आदरांजली वाहिली. डॉ. सोनाली सरनोबत यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन करून आदरांजली वाहिली. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दोन मिनिटे स्तब्धता पाळून आणि हुतात्म्यांना अभिवादन करून झाली. डॉ. …
Read More »मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!
कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर अर्धवट कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणही जखमी झाले नाही. कोसळलेले घर पत्रकार सुनील शंकर पाटील यांचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्य जेवत असताना, शेजाऱ्यांनी त्यांना घराची भिंत पडल्याची खबर दिली. घराची भिंत कोसळण्यापूर्वी पाटील कुटुंबीयांनी सुरक्षित …
Read More »सौंदत्ती रेणुका यल्लमा मंदिर प्राधिकरणास मंजुरी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लमा मंदिराच्या विकासाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतच्या श्री रेणुका यल्लमा मंदिर विकास प्राधिकरण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. सौंदत्तीतील रेणुका मंदिराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत आहे. त्याकरिता धर्मादाय मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta