बेळगाव : कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र या राज्यात गुन्हेगारी कृत्ये करून पोलिसांपासून फरार झालेला कुख्यात दरोडेखोर विशालसिंग चौहान याला बेळगाव पोलिसांनी गुंडा ॲक्ट अतंर्गत अटक केली आहे. सध्या त्याची रवानगी गुलबर्गा कारागृहात केली आहे. एक खून, पाच खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, चोरी, दरोडा, अवैध शस्त्रांचा वापर अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो तीन राज्यांच्या …
Read More »रायबागमध्ये कार उलटली : दोघांचा जागीच मृत्यू
बेळगाव : रायबाग तालुक्यातील हंदीगुंड गावाच्या हद्दीत चालकाचा कारवरील ताबा सुटून कार विजेच्या खांबाला धडकून कार उलटली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. रायबाग तालुक्यातील पलभावी गावातील महालिंग गुरुपद निंगनूर (४७) इराप्पा चन्नाबसू उगारे (३२) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले इमाम राजेसाब सनदी हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर हारुगेरी …
Read More »१३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर घटप्रभा नदीत उलटला
बेळगाव : घटप्रभा नदी ओलांडताना १३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील आवरादी गावात हा अपघात झाला. घटप्रभा नदी ओलांडत असताना ट्रॅक्टर नदीत उलटला. ट्रॅक्टरमध्ये १३ जण होते. त्यातील १२ जण सुदैवाने बचावले तर एक बेपत्ता आहे. १३ जण आवरादीहून नांदगावकडे ट्रॅक्टरने मजुरीसाठी जात होते. घटप्रभा …
Read More »कर्ले-बेळगुंदी रस्त्यावर धावत्या दुचाकीवर झाड कोसळून तरुण जागीच ठार
बेळगाव : कर्ले-बेळगुंदी रस्त्यावरील बेळगुंदी स्मशानभूमीजवळ धावत्या दुचाकीवर झाड कोसळून एक तरुण जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले आहेत. रविवारी (दि.९) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. सोमनाथ रवळू मुचंडीकर (वय २०, रा. कर्ले) असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमनाथ व …
Read More »मंगाई नगर येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू
बेळगाव : मंगाई नगर वडगाव येथे तलावात बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. उदय गुरुराज सेठ (39) मुळगाव उत्तर कन्नड जिल्हा सध्या राहणार वडगाव मांगाई नगर असे तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, उदय हा तलावाकडे …
Read More »बेळवट्टी माध्यमिक विद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन
बेळगाव : बेळवट्टी (ता. बेळगाव) येथील विश्वभारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात नुकताच संगणक कक्षाचे उदघाटन व ईमारतीच्या नुतनीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. शाळा बांधकाम समिती व विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यु. एस. होनगेकर होते. संस्थेचे संचालक बी. बी. देसाई, निवृत्त मुख्याध्यापक पी. एम. बेळगावकर, माजी …
Read More »चार्टर्ड अकाउंटंट्सची राष्ट्रीय परिषद 9 आणि 10 जून रोजी
बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेच्या वतीने संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बेळगाव येथील केएलई सेन्टेनरी हॉलमध्ये 9 आणि 10 जून रोजी चार्टर्ड अकाउंटंट्सची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुंदडा यांनी दिली. बेळगावातील आयसीएआय हॉलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, इन्स्टिट्यूट …
Read More »म. ए. समितीच्या लोकप्रतिनिधींमुळेच बेळगावात भाजपचा विजय : महांतेश कवठगीमठ
बेळगाव : नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकार्यामुळे जगदीश शेट्टर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले, अशी कबुली माजी आमदार महंतेश कवठगीमठ यांनी दिली. शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कवठगीमठ म्हणाले की, निजदचे पदाधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी महापौर व माजी नगरसेवकांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळेच भाजपला इतके …
Read More »जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव आयोजित जागतिक तंबाखू विरोधी दिन
बेळगाव : दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनासाठी नवीन घोषवाक्य ठेवली जातात. 2024 चे घोषवाक्य म्हणजे “तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे जेणे करून भावी पिढ्यांचे संरक्षण केले जाऊ शकते” या राष्ट्रीय हेतूचा उद्देश साधून जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) व शहापूर येथील गोवावेस स्थित न्यू गर्ल्स हायस्कूलच्या सहकार्यातून …
Read More »महांतेश नगर येथील विकासकामाला प्रारंभ
बेळगाव : महांतेश नगर भागात पावसाळ्यात रस्त्यांवर तुंबणारे पाणी आणि पिण्याच्या समस्यांशी संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी अलीकडेच सर्वे केला होता. यानंतर या भागातील समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार आज आमदारांच्या अनुपस्थितीत आमदारांचा मुलगा अमन सेठ यांनी स्थानिक नगरसेवक आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta