Sunday , September 20 2026
Breaking News

शरद पवार 2 सप्टेंबर रोजी बेळगावात; कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार

Spread the love

 

बेळगाव : कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समारंभाच्या तयारीसाठी आज सायंकाळी पाच वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे स्वागत समितीची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. बाळाराम पाटील हे होते. बैठकीच्या सुरुवातीस श्री. नितीन आनंदाचे यांनी गेल्या बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन केले. यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. मनोहर किणेकर, श्री. आर. एम. चौगुले, श्री. बी. एस. पाटील, श्री. लक्ष्मण होनगेकर, श्री. रामचंद्र मोदगेकर त्याचप्रमाणे सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन म्हणून निवड झालेल्या श्री. नारायणराव खांडेकर यांचे अभिनंदन करण्यात आले. दिनांक 2 सप्टेंबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या बेळगावमधील कार्यक्रमासंदर्भात सभासदांना माहिती देण्यात आली. कोल्हापूरहून श्री. शरदचंद्र पवार बेळगावला येणार असून दीपक दळवी यांच्या घरी धावती भेट देऊन ते कार्यक्रमास येणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील आणि महाराष्ट्राचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. दिनेश ओऊळकर हेही उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमास बेळगावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमा दिवशी व्यासपीठावर व व्यासपीठासमोर होणारी आसन व्यवस्था आणि कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांना झेड पोलीस सुरक्षा असल्यामुळे घ्यावयाची काळजी यावरही चर्चा करण्यात आली. याबाबत पोलीस खात्यांबरोबर चर्चा करण्याचे ठरले. आजच्या बैठकीत श्री. अप्पासाहेब गुरव, श्री. दिगंबर पवार, श्री. मनोहर किणेकर, श्री. प्रकाश मरगाळे, श्री. मालोजी अष्टेकर, श्री. बाळासाहेब काकतकर, श्री. लक्ष्मण होनगेकर, श्री. शिवाजीराव हंगिरकर, श्री. नारायणराव खांडेकर इत्यादीनी चर्चेत भाग घेतला.

आजच्या बैठकीला सौ. भाविकाराणी होनगेकर, सौ. भारती किल्लेकर, श्री. शिवराज पाटील, श्री. गजानन घोरपडे, श्री. विक्रम पाटील, श्री. आर. एम. चौगुले, श्री. रघुनाथ बांडगे, श्री. संजय मोरे, श्री  नेताजीराव जाधव, श्री. ईश्वर लगाडे, श्री. अनंत लाड, श्री. महादेव चौगुले, श्री. अजित यादव, श्री. विकास कलघटगी, श्री. संजय गुरव इत्यादी उपस्थित होते. श्री. आप्पासाहेब गुरव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *