Sunday , July 26 2026
Breaking News

कित्तूर नगरपंचायत सदस्याचे अपहरण!

Spread the love

 

कित्तूर : कित्तूर नगरपंचायत सदस्याचे रात्री अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे.

कित्तूर नगरपंचायतीचे भाजप सदस्य नागेश असुंडी हे शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौकीमठ क्रॉसजवळ उभे असताना त्यांचे अपहरण करण्यात आले.

येत्या ३ सप्टेंबर रोजी कित्तूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. एकूण २० सदस्यांपैकी १० सदस्य भाजपचे तर १० सदस्य काँग्रेसचे आहेत त्यामुळे कदाचित हे अपहरण झाले असावे.

यावर बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, भाजप सदस्याच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

कित्तूर पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रवीण गंगोळ आणि कर्मचाऱ्यांनी अपहरण झालेल्या राष्ट्रीय महामार्ग चौकीमठ चौकाची पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *