Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

युवा समितीच्या वतीने व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : एस. के. ई. सोसायटीची व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळा भाग्यनगर, बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मंगळवार दिनांक ९/७/२०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना आणि अभंगाने केली. युवा समिती सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी मराठी माध्यमातूनही …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर येथील सांस्कृतिक व ई.ल.सी‌. विभागाचा उद्घाटन सोहळा संपन्न

  बेळगाव : दि. ९-७-२४ आळवण गल्ली शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर बेळगाव येथे सांस्कृतिक विभागाचे व ई.ल.सी उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी प्रियांका हिच्या स्वागत नृत्याने व इशस्तवन गीताने झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिर्देशक श्री. एम. एम. कांबळे सर तसेच श्री. गोविंदराव …

Read More »

जिल्हा अर्बन सहकारी बँकांची परिषद गोव्यात संपन्न

  बेळगाव : बेळगाव जिल्हा अर्बन सहकारी बँक असोसिएशनची दोन दिवसीय परिषद गोवा येथील हॉटेल हेरिटेज येथे 8 व 9 जुलै रोजी संपन्न झाली. असोसिएशनच्या सभासद असलेल्या जिल्ह्यातील अर्बन बँकांचे 80 सभासद या परिषदेस उपस्थित होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मानद अध्यक्ष एम. डी. चीनमुरी हे होते तर व्यासपीठावर मानद अध्यक्ष …

Read More »

शहापूर, अनगोळ शिवारातील विद्युत ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त

  बेळगाव : शेतात असणाऱ्या कूपनलिकांचे पाणी उपसा करण्यासाठी हेस्कॉमने वीज पोहोचविण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली. परंतु योग्य नियोजनाअभावी उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत असल्याचे प्रकार शहापूर, अनगोळ आदी भागात दिसून येत आहेत. शहापूर शिवारात असणारा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त झाला आहे तर अनगोळ शिवारातील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बर्स्ट …

Read More »

बेळगावात घरफोडी प्रकरणी दोघांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी केल्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बेळगाव तालुक्यातील मूळचा किणये गावातील, सध्या सरस्वतीनगर गणेशपूर येथील चेतन मारुती शिंदे (२६) आणि करण उत्तम मुतगेकर (२७) रा. अनगोळ या दोघांना खडेबाजार पोलीस ठाणे आणि कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

विद्याभारती जिल्हा हँडबॉल स्पर्धेत संत मीरा विजेता

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर देवेंद्र जीनगौडा स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा शाळेने विजेतेपद पटकाविले तर देवेंद्र जीनगौडा शाळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत संत मीरा शाळेने देवेंद्र जीनगौडा शाळेचा 15-5 असा एकतर्फी पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या …

Read More »

सानवी बेडरे हिचे कराटे स्पर्धेत यश

  बेळगाव : ६ व ७ जुलै रोजी गदग येथे पार पडलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत श्री चांगळेश्वरी लोअर प्रायमरी स्कूल, येळ्ळूरची विद्यार्थिनी सानवी अमित बेडरे हिने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत १००० हून अधिक कराटेपटूनी सहभाग घेतला होता. तिच्या या यशाबद्दल तिचे प्रशिक्षक चंदन जोशी, नागराज जोशी यांचे मार्गदर्शन …

Read More »

कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मराठी मॉडेल शाळेच्या विद्यार्थिनीचे घवघवीत यश

  बेळगाव : गदग येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरची विद्यार्थीनी कुमारी आदिती अवधूत लोहार हिचा केटा आणि फाईट या कराटे प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला. तिचे मानचिन्ह व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. या तिच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी एसडीएमसीसदस्य श्री. मारुती …

Read More »

नोकर भरती प्रकरणात “त्या” बँकेची सीबीआय चौकशी होणार!

  बेळगाव : भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या “त्या’ बँकेच्या अध्यक्षांचे प्रताप सातत्याने समोर येत आहेत. खास करून नोकर भरती प्रकरणातील घोटाळा हा आता सीबीआयच्या दरबारात पोहोचला आहे. ‘त्या” बँकेच्या उपाध्यक्षांनी या भरती प्रकरणाची चौकशी करण्यासंबंधी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये नोकर भरती करून घेताना संचालकांच्या व कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरी …

Read More »

जायंटस ग्रुप मेनच्या वतीने डेंग्यू लस वितरण

  बेळगाव : जायंटस ग्रुप मेनच्या वतीने कपिलेश्वर मंदिर परिसरात डेंग्यू प्रतिबंधक लस वितरण करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात वाढते डेंग्यूबाधित रूग्ण पाहून जायंटस् ग्रुप मेनच्या वतीने लसीकरण शिबीर आयोजित कारण्यात आले. या शिबीरात कपिलेश्वर परिसरातील नागरीक मंदिराला येणाऱ्या भक्तासह 500 हुन अधिक जणांना याचा लाभ झाला. जायंटस अध्यक्ष अविनाश पाटील, …

Read More »