Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात तरुणाची हत्या

  बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात शुक्रवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मंजू कोलकार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. वकुंद गावातील मंजू आपल्या मित्रासोबत बहिणीला औषध देण्यासाठी होसुर येथे गेला होता. खून मित्रानेच केल्याचा संशय असून मुरुगोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास …

Read More »

वीर सौध योगा केंद्रातर्फे रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन‌ साजरा

  टिळकवाडी : येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिन‌ व‌ रथसप्तमी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उषा दळवी यांनी अग्निहोत्र करून विधीवत मंत्रोच्चार केले. वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. रथसप्तमी भगवान सूर्यनारायण चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समिती शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न यासंदर्भात चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री श्री. शंभूराज देसाई, उद्योग मंत्री श्री. उदय सामंत, श्री. भरत गोगावले, श्री. संजय राठोड, आमदार श्री. राजेश क्षीरसागर …

Read More »

बेळगाव शहरातील एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 450 कोटी

  बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी आपला विक्रमी 15 वा अर्थसंकल्प सादर केला असून ज्यामध्ये बेळगाव शहरातील गर्दी कमी करण्यासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने बेळगाव शहरात 4.50 कि.मी. लांबीच्या एलिवेटेड कॉरिडोरचे बांधकाम केले जाणार आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शहरांमध्ये राष्ट्रीय महामार्ग …

Read More »

डॉ. विनोद गायकवाड यांच्या ‘मिडल क्लास’ कादंबरीस राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार

  बेळगाव : येथील प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. विनोद गायकवाड यांच्या ‘मिडल क्लास’ या कादंबरीला श्री कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था, कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांच्यावतीने 2023 सालचा राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी संस्थेच्या वतीने एका पत्रकाद्वारे …

Read More »

क्रीडाभारती आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रम उत्साहात

  बेळगांव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर क्रीडाभारती, आरोग्य भारती, विद्याभारती व पतंजली योग समिती यांच्यावतीने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रोचे सेवानिवृत्त इंजिनियर व अहमदाबाद येथील राष्ट्रीय स्वयंसेवकाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामणी पाटील, क्रीडाभारतीचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक …

Read More »

47 वर्षानंतर भेटले श्री शिवाजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी : स्नेहमेळावा संपन्न

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या 1977 बॅचचे दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सुमारे 47 वर्षानंतर एकमेकांना भेटले. सुमारे साडेचार दशकानंतर एकमेकांना भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह जाणवत होता. प्रत्येक जण एकमेकाची आदराने चौकशी करीत होते, काहीजण एकमेकांना मिठी मारून जुन्या आठवणीमध्ये रमत होते. प्रत्येकाला शाळेमधील ते दिवस आठवत …

Read More »

येळ्ळूरला 25 रोजी अश्वारूढ शिवमुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व विविध कार्यक्रम

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील हिंदवी स्वराज्य युवक संघ व येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पंचधातूची 13 फुटी अश्वारूढ शिवमूर्ती येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौकामध्ये उभारण्यात येणार आहे, अश्वारुढ शिवमुर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवार (ता. 25) रोजी महाराष्ट्र चौकामध्ये होणार आहे, तत्पूर्वी रविवार (ता. 18) रोजी सकाळी आठ वाजता मूर्ती …

Read More »

राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न

  बेळगाव : जिजाऊ ब्रिगेड (राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानचा) १५-२-२०२४ रोजी दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या शानदार कार्यक्रमात १२ महिलांचा अधिकार ग्रहण समारंभ पार पडला. दीपप्रज्वलन व स्वागत गीतानंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला. प्रमुख वक्त्या म्हणून सौ. सुनिता पाटणकर यांनी राजमाता जिजाऊंबद्दल आपले अभ्यासू मत मांडले. त्यानंतर दुसऱ्या वक्त्या सौ. …

Read More »

गोकुळने सीमाभागातील दूध दर पूर्ववत करावेत : युवा समितीची मागणी

  बेळगाव : बेळगाव, निपाणी भागातील बहुतांश दूध उत्पादक शेतकरी गोकुळला (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) दूध पुरवठा करतात पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सीमाभागातील म्हैशीच्या व गाईच्या खरेदी दरात कपात केली आहे, आदीच पशुखाद्य व वैरणीचे दर भरमसाठ वाढले असताना फक्त सीमाभागातील दूध दर कमी करणे हा सीमाभागातील शेतकऱ्यावर अन्याय …

Read More »