Friday , December 19 2025
Breaking News

बेळगाव

साखर कारखान्यांनी आधी दर जाहीर करावा; जिल्हाधिकाऱ्यांची बैठकीत सूचना

  बेळगाव : ऊस दराची घोषणा करण्याआधीच काही कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यापूर्वी कारखानदारांना दर जाहीर करण्यासंबंधी सूचनाही करण्यात आली होती. सध्या हंगाम सुरू केलेल्या व यापुढे सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नितेश पाटील यांनी केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी …

Read More »

नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 100 कोटी अनुदान

  बेळगाव : नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम येत्या जानेवारीत प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस. एम. सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडांगणावर राज्योत्सव समारंभात …

Read More »

काळ्यादिनी मराठी भाषिकांचा एल्गार!

बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्याच्या निषेधार्थ समस्त सीमावासीय 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून आचरणात आणतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विराट सायकल फेरी काढण्यात आली. निषेध फेरीसाठी सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महिला, आबालवृद्ध संभाजी उद्यानात …

Read More »

सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नी सुनावणी पुन्हा लांबणीवर

  बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमापश्नी आज बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी होणारी सुनावणी न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश रजेवर असल्यामुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. कर्नाटकचे कायदामंत्री एच. के. पाटील यांनी पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचे …

Read More »

सकल मराठा समाजाची उद्या बैठक

  बेळगाव : बेळगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक २ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मराठायोद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले …

Read More »

प्रादेशिक आयुक्तांनी महापालिकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा

  माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने प्रादेशिक आयुक्तांना निवेदन सादर बेळगाव : बेळगाव महापालिकेत प्रशासन आणि विरोधकांमध्ये विविध कारणांवरून संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक संघटनेने आज बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एस. बी शेट्टण्णावर यांची भेट घेतली. महापालिकेतील संघर्षाबाबत महापौर शोभा सोमनाचे आणि सत्ताधारी नगरसेवकांनी यापूर्वी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेतली होती. …

Read More »

येळ्ळूर येथील स्पर्धेत कल्लेहोळचे भजन प्रथम; भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार (ता. 29) रोजी परमेश्वर नगर येळ्ळूर येथील नेताजी मराठी सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक युवराज हुलजी, माजी …

Read More »

शहरातील रहदारी मार्गात उद्या बदल; अवजड वाहनांना प्रवेशबंदी

  बेळगाव : राज्योत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे बुधवारी (ता. १) शहरातील रहदारी मार्गात बदल करण्यात आला आहे. सकाळी ८ पासून मिरवणूक संपेपर्यंत खालील मार्गावरील वाहने अन्यत्र वळविण्यात आली आहेत, असे पोलिस आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्हा क्रीडांगणापासून राज्योत्सव मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर सर्कल, डॉ. आंबेडकर रोड, चन्नम्मा चौक, काकती वेस, …

Read More »

परवानगी दिली नाही तरी काळ्या दिनाची फेरी निघणारच

  बेळगाव : भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह मराठीबहुल सीमाभागात कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे बुधवारी (दि. १) काळा दिन पाळण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता संभाजी उद्यानापासून निषेध फेरी निघणार असून मराठा मंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. या फेरीतील महाराष्ट्रातील नेत्यांच्या सहभागाबाबत लोकांत उत्सुकता आहे. पोलिसांनी परवानगी दिली …

Read More »

भरपाई द्या, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

  अतिवाडमधील शेतकरी; नेत्यांच्या सद्बुद्धीसाठी फोडले ११ नारळ बेळगाव : तलाव निर्मितीसाठी बेक्कीनकेरी (ता. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील अतिवाड गावात १५ वर्षांपूर्वी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र, त्या मोबदल्यातील भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्याचा निषेध नोंदवत भरपाई द्या, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा अतिवाड ग्रामस्थ आणि राष्ट्रीय रयत संघातर्फे …

Read More »