Friday , November 6 2026
Breaking News

श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : 27 फेब्रुवारी कवी वी. वा. शिरवाडकर यांच्या जन्म दिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो बापट गल्लीतील श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषा दिन साजरा केला जातो गल्लीतील पांच श्री. गोपाळराव केसरकर यांच्या हस्ते कवी वी. वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. महेश पावले यांनी बेळगावच्या बोली भाषा बोलण्यात जो गोडवा आहे तो अन्य भाषेत मिळणार नाही तसेच भाषा बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर केला जातो तसे न करता अनेक परकीय भाषेला मराठी शब्दांचा पर्याय उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा असे सांगितले. मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा आपल्या पाल्यांना मराठी वाङ्मय वाचनाची सवय लावावी जने करून मराठी भाषा समृध्द होईल असे विचार मांडले. या वेळी सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, सुनील केसरकर, गजानन निलजकर, महादेव केसरकर, नंदू मोरे, अभिषेक निलजकर, अमोल किल्लेकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *