Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

एस. आर. एस. हिंदुस्थान संघ ठरला वरदराज चषकाचा मानकरी

  बेळगाव : दोस्ती ग्रुप भवानीनगर आयोजित वरदराज ट्रॉफी सीजन थ्री क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीराम सेना हिंदुस्थान संघाने शौर्य स्पोर्ट्स संघाचा पराभव करत वरदराज चषकावर आपले नाव कोरले आहे. गेल्या तीन वर्षापासून बेळगाव येथील भवानीनगर येथील दोस्ती ग्रुप यांच्यावतीने वरदराज ट्रॉफी श्री गणेश ट्रॉफीचे आयोजन करण्यात येते. अंतिम सामन्यात …

Read More »

म. ए. समितीच्या कोरे गल्ली, रामलिंगवाडी कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरे गल्ली, रामलिंगवाडी येथे कार्यकर्त्यांकडून रविवारी दि. 25 रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रथम शिवपूजन करून कवी कुसुमाग्रज आणि मराठी भाषेचे महत्व पहुण्यांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश …

Read More »

टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा; गोविंद टक्केकर यांचा उपक्रम

  बेळगाव : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली. त्यामुळे यावर्षी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावरच पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. याची काळजी घेऊन सुळगा, देसुर, राजहंसगड यरमाळ या चार गावांसाठी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा गेल्या मंगळवारपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती श्रीराम बिल्डर डेव्हलपर्सचे मालक श्री. गोविंद टक्केकर यांनी दिली …

Read More »

पोलिस आयुक्तांनी मानले गणेशोत्सव महामंडळाचे आभार!

  बेळगाव : बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे येत्या 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीत सहकार्य केलेल्या शहरातील विविध संस्था -संघटनांना धन्यवाद देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी आज शनिवारी सकाळी गणेशोत्सव दोन्ही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सदाशिवनगर येथील …

Read More »

येळ्ळूरला छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातूमूर्तीचा लोकार्पण सोहळा उद्या

  येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून येळ्ळूर गावच्या मधोमध असलेल्या महाराष्ट्र चौकामध्ये अश्वारूढ शिवपुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र चौक येळ्ळूर येथे उद्या रविवार (ता. 25) रोजी सकाळी सकाळी 10:00 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. हा लोकार्पण सोहळा कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती …

Read More »

बेल्काॅन आणि ऑटो एक्स्पोचा उद्या शेवटचा दिवस

  बेळगाव : क्रेडाई आणि यश इव्हेंट्स यांनी गेल्या 22 फेब्रुवारीपासून येथील सीपीएड मैदानावर सुरू केलेल्या बेल्कॉन या बांधकाम व्यवसायाशी संबंधित आणि ऑटो एक्स्पोचा या सर्व प्रकारच्या वाहनासंदर्भात सुरू केलेल्या प्रदर्शनाला समस्त बेळगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. असे असले तरी रविवार हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी विविध स्पर्धांचे आयोजन या …

Read More »

यरमाळ येथे स्वखर्चातून पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खुदाई

  बेळगाव : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे यावर्षी सर्वांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी बांधकाम व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी स्वखर्चातून चार गावांना टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर देसूर आणि यरमाळ गावासाठी स्वखर्चातून कुपनलिका खोदून दिलेल्या आहेत. आज शनिवारी यरमाळ …

Read More »

सोनट्टीत 12 लाख रुपये किंमतीची 5,700 लिटर हातभट्टीची दारू जप्त

  बेळगाव : बेळगावजवळच्या डोंगराळ भागातील सोनट्टी गावात धाडसी मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात हातभट्टीच्या गावठी दारूचा साठा जप्त केला. डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने 12 लाख रुपये किंमतीची 5,700 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. बेळगाव शहराजवळील डोंगराळ भागातील सोनट्टी गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळण्याचा …

Read More »

युवा समितीतर्फे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने प्रति वर्षीप्रमाणे २०२३ -२४ सालचे युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार खालील शाळांना जाहीर करीत आहोत. इंग्रजी शिक्षणाकडे सर्वांची ओढ असून देखील पुरस्कार प्राप्त शाळांनी आधुनिक शिक्षण पद्धती अवलंबत मातृभाषेतून शिक्षण देत असताना वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत, या शाळांमध्ये …

Read More »

श्री समादेवी वार्षिक उत्सवानिमित्त नवचंडिका होम, महाप्रसाद उत्साहात संपन्न

  बेळगाव : बेळगाव शहरातील जागृत देवस्थान असलेल्या समादेवी गल्लीतील श्री. समादेवी वार्षिक जन्मोत्सवाच्या शुक्रवारी चौथ्या दिवशी श्रीला महाअभिषेक आणि नवचंडिका होम मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला. श्री समादेवी मूर्तीला गौतम भटजी रामकृष्ण भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीला महाभिषेक घालण्यात आला. सकाळी ६:३० ते सकाळी 11 पर्यंत नागेश शास्त्री हेर्लेकर, निळकंठ हेर्लेकर, …

Read More »