Monday , September 21 2026
Breaking News

सोनट्टीत 12 लाख रुपये किंमतीची 5,700 लिटर हातभट्टीची दारू जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगावजवळच्या डोंगराळ भागातील सोनट्टी गावात धाडसी मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात हातभट्टीच्या गावठी दारूचा साठा जप्त केला. डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने 12 लाख रुपये किंमतीची 5,700 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली.

बेळगाव शहराजवळील डोंगराळ भागातील सोनट्टी गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळण्याचा अवैध व्यवसाय सुरु असल्याची निश्चित माहिती बेळगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गावावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे 5,700 लिटर हातभट्टीची दारू आढळून आली. डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक पोलिसांची तीन ते चार पथके तयार करून हातभट्टीची दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी विविध आकाराच्या बॅरल्स आणि भांड्यात साठवून ठेवलेली आणि कच्ची गावठी 5,700 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. हातभट्टीची दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवर केलेल्या छापेमारीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिध्दरामप्पा म्हणाले की, आम्ही एकूण 5,700 लिटर दारू जप्त केली आहे. काही घरांवरही छापे टाकून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. याबाबतची माहिती आठवडाभरापूर्वी समोर आली होती. त्याची खातरजमा करून आम्ही आज ऑपरेशन राबवलेले. आम्ही आरोपींना अटक करून चौकशी करू. पोलिस येताच सर्वजण पळून गेले. त्यापैकी फक्त एक सापडला आहे. काही दिवसांपासून येथे व्यवसाय सुरू आहे. आता आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *