Sunday , July 26 2026
Breaking News

यरमाळ येथे स्वखर्चातून पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खुदाई

Spread the love

 

बेळगाव : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे यावर्षी सर्वांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी बांधकाम व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी स्वखर्चातून चार गावांना टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर देसूर आणि यरमाळ गावासाठी स्वखर्चातून कुपनलिका खोदून दिलेल्या आहेत. आज शनिवारी यरमाळ येथे कुपनलिका खुदाई कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गोविंद टक्केकर यांनी मशीनचे पूजन केले.

यावेळी बोलताना टक्केकर म्हणाले, ग्रामीण भागात पाण्याच्या दुर्भिक्ष आहे. पुढील काही दिवसात पाण्याचे संकट वाढणार आहे.याची दखल घेऊन देसुर आणि यरमाळ गावासाठी कूपनलिका खोदली जात आहे. नवीन कुपनलिकांमुळे या दोन गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. पुढील काही दिवसातही अन्य गावात मी स्वतः खर्चाने कुपनलिका खोदून देणार आहे. यकामात गावकऱ्यांच्या सहकार्य मोलाचे आहे. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या निकिता सुतार, महादेव दळवी, निलेश सुतार, मारुती पाटील, दशरथ पाटील, भरमन्ना पाटील, अजित लोहार, ज्योतिबा पाटील, कृष्णा नाईक, निलेश पाटील, पांडुरंग तुपटकर, शाहू नाईक, कृष्णा सावंत, किरण हुंदरे, पूजा शहापूरकर, बसवंत नाईक व अन्य गावकरी उपस्थित होते. टक्केकर यांनी गावात कुपनलिका खोदल्याबद्दल गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *