Monday , September 21 2026
Breaking News

युवा समितीतर्फे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने प्रति वर्षीप्रमाणे २०२३ -२४ सालचे युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार खालील शाळांना जाहीर करीत आहोत.
इंग्रजी शिक्षणाकडे सर्वांची ओढ असून देखील पुरस्कार प्राप्त शाळांनी आधुनिक शिक्षण पद्धती अवलंबत मातृभाषेतून शिक्षण देत असताना वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या उल्लेखनीय आहे. आणि दर्जेदार शिक्षणातून या शाळा आपला वेगळा ठसा उमटवत आहेत म्हणून युवा समिती त्यांच्या कार्याची दखल घेऊन कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ “युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार २०२३-२४” देऊन गौरव करत आहे. हे पुरस्कार बेळगाव मधील ५ मतदारसंघ निहाय जाहीर करण्यात आले आहेत.

*बेळगाव उत्तर- कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळा, कॅम्प बेळगाव

* बेळगाव ग्रामीण- बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी ता.जि. बेळगाव

* बेळगाव दक्षिण- सरकारी मॉडेल शाळा येळ्ळूर, ता.जि. बेळगाव

* खानापूर- सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा चिकले, ता. खानापूर जि. बेळगाव

* यमकनमर्डी- सरकारी आदर्श प्राथमिक मराठी शाळा काकती, ता. जि. बेळगाव

सर्व शाळांच्या शिक्षकवर्ग, शाळा सुधारणा कमिटी व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सदर पुरस्काराचे वितरण व सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे होणार असून संबंधित शाळेच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, शा.सु. समिती, आणि पालकवर्ग यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *