Friday , December 19 2025
Breaking News

बेळगाव

सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई

  बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांचा इशारा बेळगाव : सोशल मीडियावर प्रक्षोभक आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर यापुढे पोलीस विभागाची करडी नजर असणार आहे. सोशल मीडियावरील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयामध्ये मीडिया मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्यात आली असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त …

Read More »

प्रशासनाकडून श्री महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

  बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका आणि जिल्हा परिशिष्ट कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी श्री महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील कुमार गंधर्व रंग मंदिर येथे आज सकाळी श्री महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महापौर शोभा …

Read More »

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लक्षवेधी आंदोलन करू : मनोज जरांगे -पाटील

  बेळगाव : मराठा आरक्षणासोबतच सीमाप्रश्नही प्रत्येक मराठी माणसासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आपण सीमाप्रश्नासाठी लक्षवेधी आंदोलन करू, असे आश्वासन मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक मनोज जरांगे पाटील यांनी केले. शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंतरवाली सराटी (जालना, महाराष्ट्र) येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सीमाप्रश्नाबाबत …

Read More »

काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा शहापूर समितीच्या बैठकीत निर्धार

  बेळगाव : बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक गेली 67 वर्षे स्वाभिमानाने लढा देत असताना बेळगावातील राष्ट्रीय पक्ष स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी मराठी भाषिक आणि मराठा समाजाचा आधार घेत आहेत आणि कारण नसताना त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाला ओढत आहेत असा आरोप करत महाराष्ट्र समिती विरोधी गरळ ओकणाऱ्या नगरसेवक राजू भातकांडे …

Read More »

बेळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत पाच दुकाने फोडली

  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पांगुळ गल्लीसह विविध ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एका रात्रीत पाच दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. आज शनिवारी सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी धुडगूस घातल्याने पोलिसांसमोर चोऱ्यांचा तपास लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.   पांगुळ गल्ली आणि …

Read More »

शब्दगंध कवी मंडळाचा वर्धापन दिन उद्या

  कवी आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळाचा ३३वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालयात होणार आहे. प्रा. अशोक आलगोंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या कार्यक्रमात कवी आबासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित …

Read More »

मंगल संताजी हिची राज्य पातळीवर निवड

  बेळगाव : हलगा (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थ्यांनी कु. मंगल केदारी संताजी हिची राज्य पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे. बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सरकारी प्राथमिक मराठी शाळा हलगा शाळेची विद्यार्थ्यांनी मंगल केदारी संताजी हिने …

Read More »

ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

  बेळगाव : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रात्री 9 च्या सुमारास बेळगाव बस स्थानकाजवळील सर्किट हाऊस समोर घडली. मोहन भरमा पाटील (वय 55) रा. मंडोळी असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. बेळगाव उत्तर रहदारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकने मोहन पाटील यांच्या स्प्लेंडर दुचाकीला …

Read More »

महापालिका वाद राज्यपालांच्या दरबारी; महापौरांनी घेतली राज्यपालांची भेट

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील वाद आता थेट बेंगळूरच्या राजभवनात पोहोचला आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन महापालिकेच्या कारभारात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्तक्षेपाविरोधात तक्रार केली आहे. करवाढीच्या ठरावात बेकायदा दुरुस्ती, महापौरांच्या सहीची फाईल गहाळ होणं आदी कारणावरून …

Read More »

येळ्ळूर नेताजी युवा संघटना आयोजित भजन स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ प्रथम

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित संगीत भजन स्पर्धेत श्रीहरी संगीत कला मंच कल्लेहोळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ टिळकवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला असून, रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी व विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कुद्रेमनी, चौथा …

Read More »