Friday , December 19 2025
Breaking News

बेळगाव

सुळगे (येळ्ळूर) नेताजी हायस्कूलमध्ये येळ्ळूर विभागीय प्रतिभा करंजी स्पर्धा संपन्न

    बेळगाव : सुळगे (येळ्ळूर) येथील द. म. शि. मंडळ संचलित नेताजी हायस्कूलमध्ये येळ्ळूर विभागीय माध्यमिक प्रतिभा कारंजी स्पर्धा शुक्रवार दि. 1 रोजी घेण्यात आल्या. त्यानिमित्ताने आयोजित उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी भावकेश्वरी कृषि पत्तीन संस्थेचे चेअरमन श्री.रामचंद्रराव नंद्याळकर हे होते प्रास्ताविक आणि स्वागत मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण यांनी केले. …

Read More »

लाईफ टॅक्समध्ये वाढीच्या निषेधार्थ ट्रक चालकांचा सोमवारी बंद

  बेळगाव : कर्नाटक सरकारने लाईट कमर्शियल वाहनांवरील आजीवन करत तिपटीने वाढ केल्याच्या निषेधार्थ आणि हा कर पूर्णतः मागे घेण्याच्या मागणीसाठी मालवाहू वाहनांच्या मालकांनी येत्या सोमवारी बंद पुकारला आहे. या संदर्भात लॉरी असोसिएशनच्या सदस्यांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून सरकारच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना असोसिएशनचे सदस्य …

Read More »

कावळेवाडीच्या रवळनाथ कणबरकर याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील उदयोन्मुख पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने बेळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रवळनाथ कणबरकर यांनी 80 किलो वजनी गटाची अंतिम फेरी जिंकून विजेतेपद मिळवल्याने त्याची राज्यस्तरीय निवड …

Read More »

राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मैत्रेयी शिंदेला उपविजेतेपद

  बेळगाव : कर्नाटक कायदा विद्यापीठ हुबळी यांच्या कर्नाटक कायदा महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मैत्रेयी शिंदे व महंत यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. नयानगर, हुबळी येथील महाविद्यालयाच्या सभागृहात दि. 26 व 27 ऑगस्ट रोजी या 9 व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …

Read More »

कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून सफाई कामगाराची आत्महत्या

  बेळगाव : कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून ज्योती नगर, गणेशपूर येथील एका सफाई कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव शशिकांत सुभाष ढवाळे (वय 28, रा. ज्योतीनगर गणेशपुर) असे आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शशिकांत हा गेल्या दहा ते बारा वर्षापासून महानगरपालिकेत …

Read More »

विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने पिता-पुत्राचा मृत्यू; बैलहोंगल तालुक्यातील घटना

    बेळगाव : विजेच्या तारेला स्पर्श होऊन पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील उडीकेरी गावात घडली. प्रभू हुंबी (वय 69) व मंजुनाथ हुंबी (29) अशी दुर्दैवी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. घरासमोरील विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श होऊन एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप …

Read More »

उद्योग खात्रीतील सामग्रीसाठी ८२ कोटी; जिल्ह्यात उद्या होणार वितरण

  बेळगाव : काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर विविध योजना लागू केल्या आहेत. याचबरोबर महत्त्वाकांक्षी असणाऱ्या उद्योग खात्री योजनेतील सामग्रीचेही वितरण करण्याचे नियोजन केले आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच राज्यभरातील सामग्री निधी वितरित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, उद्योग खात्री योजनेतील सामग्रीसाठी जिल्ह्यात तब्बल ८२ कोटींचा निधी वितरित करण्यात येणार …

Read More »

तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 2200 झाडे लावण्याचा संकल्प

  बेळगाव : तालुक्यात सध्या झाडे लावण्यासाठी उद्योग खात्री योजना पर्याय ठरत आहे. आता विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत असून तालुक्यात उद्योग खात्री योजनेतून 1 लाख 25 हजार 400 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सध्या या कामाला गती मिळाली असून तालुका पंचायत व वनविभाग सक्षमपणे काम करत असल्याचे सांगण्यात येत …

Read More »

कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजाची कडक बंदोबस्तात बिम्समध्ये वैद्यकीय तपासणी

  बेळगाव : कारवार येथील उद्योगपती नायक यांच्या हत्याप्रकरणी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजाची तब्येत बिघडली असून त्याला आज तातडीने बिम्स जिल्हा रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उद्योगपती नायक यांच्या हत्याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजा याला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. …

Read More »

जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला तिहेरी मुकुट

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत प्राथमिक मुलांचे व माध्यमिक मुला-मुलीचे विजेतेपदासह संत मीरा शाळेने तिहेरी मुकुट संपादन करीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे मच्छे येथील डिव्हाईन मर्सी शाळेच्या मैदानावर बेळगाव ग्रामीण तालुका रेंज व डिवाइन मर्सी इंग्रजी माध्यम शाळा पिरनवाडी आयोजित जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत …

Read More »