Monday , September 21 2026
Breaking News

गायिका अंतरा कुलकर्णीची श्री समादेवी मंदिराला भेट

Spread the love

 

बेळगाव : बेळगावची कन्या आणि संपूर्ण जगात पाहत असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोची उपविजेती अंतरा कुलकर्णी हिने दर्जेदार गाण्यांची मालिका सादर करत उपविजेतेपदाचा मान पटकाविला. या स्पर्धेतील उपविजेती अंतरा उमेश कुलकर्णी हिने बुधवारी समादेवी गल्लीतील श्री. समादेवी मंदिरला भेट देऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. बुधवारी सकाळी श्री समादेवी संस्थान आणि वैशवाणी समाज व वैश्यवानी महिला मंडळ, वैश्यवाणी युवा संघ यांच्या वतीने अंतरा अमित कुलकर्णी हिचा मंदिरात खास सत्कार करण्यात आला. यावेळी जयश्री हणमशेट, पूजा मालशेट यांच्या हस्ते श्री. समादेवीच्या आशिर्वादाची साडी, नारळ, फळे देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अक्षता कलघटगी, माजी अध्याक्षा भारती केसरकर, अश्विनी कलघटगी, शितल कुडतुरकर, भारती नाकाडी, रेखा कलघटगी, रजनी मुरुकुंबी, रवी कलघटगी, रवी मालशेट, श्री. समादेवी कार्यालयाचे व्यवस्थापक कमलाकांत घेवारी यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *