Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

काँग्रेस नेते साधून्नवर यांच्या राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेवर आयटी अधिकाऱ्यांची धाड

  बेळगांव : काँग्रेस नेते व्ही. एस. साधून्नवर यांच्या राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेवर आयटी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. बेळगांव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील सहकारी बँकेवर गोवा विभागाच्या आयटी अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. आयटी अधिकाऱ्यांनी बँकेतील सुमारे 265 लॉकर्स ची …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र उभारणीसंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह आरपीडी महाविद्यालयाला भेट देत स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र उभारणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविद्यालयाच्या आवारातील विविध इमारतींची …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी १.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज गोवावेस) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी विचार व्यक्त करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानचे शेकडो कार्यकर्ते म. ए. समितीत सामील

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या शेकडो कार्यकर्त्यांचे सभासद अर्ज महाराष्ट्र एकीकरण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे काम करण्यास सज्ज आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मराठा मंदिर येथे शुक्रवारी आयोजित मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीपूर्वी अनगोळ विभागातील कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती समिती अध्यक्ष …

Read More »

खानापूर तालुक्यातील दहा विद्यार्थी नव्या राष्ट्रीय शिक्षण नीतीचे शिकार

  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध पदवी महाविद्यालयातील जवळ जवळ दहा विद्यार्थी नवीन राष्ट्रीय शिक्षण नीतीचे (NEP) चे बळी ठरले आहेत. बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळविताना कसरत न करता प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता राज्य सरकारने UUCMS नावाचे संगणक वेबसाइट तयार केले. त्यामुळे विद्यार्थी त्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवेश घेतात. पुढे …

Read More »

शहापूर बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने

  बेळगाव : बेळगावच्या शहापूरमधील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने पार पडली. शहापूर खडेबाजारमधील प्राचीन बसवण्णा महादेव देवाची वार्षिक यात्रा शुक्रवारी सायंकाळी भक्तिभावाने पार पडली. यानिमित्तदिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हजारो भाविकांनी दिवसभर मंदिरात श्रीफळ, फुले, कापूर, उदबत्त्या आदी पूजा साहित्य घेऊन दर्शनासाठी गर्दी …

Read More »

राज्यात काँग्रेसचा विजय निश्चित : ऍड. चंद्रहास अणवेकर यांचा विश्वास

बेळगाव   40 टक्के कमिशन सरकार अशी प्रतिमा बनलेल्या भाजप सरकारला जनता विटली आहे. जनतेच्या काँग्रेस प्रति आशा वाढल्या आहेत.त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कर्नाटक राज्यात सत्तेवर येईल. त्याचबरोबर बेळगाव दक्षिण बेळगाव दक्षिण मतदार संघात काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असा विश्वास कर्नाटक प्रदेश काँग्रेस ओबीसी विंगचे राज्य उपाध्यक्ष …

Read More »

रामनवमी निमित्त श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे भव्य शोभायात्रा; भगवेमय वातावरण

  बेळगाव : हत्ती-घोडे, बैलगाड्यांसह ढोलताशांच्या गजरात रामनवमीनिमित्त बेळगावात आज श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या मिरवणुकीत हजारो रामभक्तानी जल्लोषात सहभाग घेतला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला बेळगावात आज अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे शहरात श्रीराम, रामभक्त हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरू बसवण्णा यांच्या …

Read More »

बेळगावात रामनवमी भक्तिभावाने साजरी

  बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात आज रामनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात येतीय. यानिमित्त भक्तांनी श्रीराम मंदिरात मनोभावे पूजा करून मर्यादा पुरुषोत्तमाला नमन केले. बेळगाव शहरात आज रामनवमीनिमित्त भक्तिभावाचा पूर ओसंडून वाहात असल्याचे चित्र दिसून आले. ठिकठिकाणच्या श्रीराम मंदिरात आज पहाटेपासूनच अबालवृद्ध भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. बेळगाव शहरातील …

Read More »

‘नवहिंद सोसायटी’च्या चेअरमनपदी प्रकाश अष्टेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे

  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. प्रकाश पांडुरंग अष्टेकर यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. अनिल हणमंत हुंदरे यांची निवड करण्यात आली. सदर निवड 1 एप्रिल 2023 ते 30 नोव्हेंबर 2025 या अडीच वर्षांसाठी असणार आहे. 1 एप्रिल 2023 …

Read More »