बेळगाव : मनोरमा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्याकडून प्रा. आनंद मेणसे यांनी केलेल्या पत्रकारितेबद्दल व साहित्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल साधना क्रीडा संघ यांच्या वतीने ज्येष्ठ सदस्य श्री. प्रकाश देसाई यांच्या हस्ते प्राचार्य आनंद मेणसे यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साधना क्रीडा संघाचे खेळाडू …
Read More »सीए परीक्षेत उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा मराठी विद्यानिकेतनमध्ये सत्कार
बेळगाव : 2024 या वर्षातील सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेले मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी पवन मारीहाळ, ओमकार सुतार व स्वप्नील पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे आय आर …
Read More »सौंदत्तीजवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
उगारगोळ : हिरेकुंबीजवळ शुक्रवारी सायंकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज प्रभुनावर (वय 48, रा. सौंदत्ती), यल्लाप्पा कोरविनकोप्प (46, रा. हंचिनाळ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामदुर्गचे डीवायएसपी पांडुरंगय्या आणि सौंदत्तीचे सीपीआय डी. एस. …
Read More »तलाठ्याच्या गाडीत सापडले १ कोटी दहा लाख रुपये..
बेळगाव : एक तलाठी आपल्या कारमध्ये 1 कोटी 10 लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी छापा टाकून कागदोपत्री नोंद नसलेली रक्कम जप्त केली. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगट्टी चेकपोस्टजवळ पोलिसांनी ग्राम लेखापालाची गाडी अडवली असता त्यांना तलाठ्याच्या गाडीत रुपये सापडले व ते जप्त केले. निपाणी तालुक्यातील ग्राम लेखापाल असलेल्या …
Read More »समादेवी मंदिराबाबत अधिसूचना काढणे चुकीचे
बेळगाव : धर्मादाय खात्याने चुकीच्या माहितीच्या आधारे समादेवी मंदिरावर सरकारी समिती स्थापन करण्याबाबत अधिसूचना काढली आहे, असा दावा करत समादेवी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार दि. १८ धर्मादाय खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली. त्यामुळे सरकारी समितीच्या यादीतून समादेवी मंदिराचे नाव वगळण्यात येईल, …
Read More »बेळगाव हेस्कॉम ग्राहकांची तक्रार निवारणासंदर्भात उद्या बैठक
बेळगाव : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची मासिक बैठक शनिवारी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हेस्कॉम सहाय्यक कार्यकारी अभियंता उपविभाग 1, बेळगाव यांच्या कार्यालयात होणार आहे. वीज पुरवठा, बिलिंग व वीज विभागाच्या इतर समस्यांबाबत ग्राहकांना त्यांचे नाव, आरआर क्रमांक, पत्ता व मोबाईल क्रमांकासह लिखित सूचना या बैठकीत देता …
Read More »कन्नडिगांना नोकरीत आरक्षण मिळावे; करवे प्रवीण शेट्टी गटाची बेळगावात निदर्शने
बेळगाव : कन्नडिगांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज करवे प्रवीण शेट्टी ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी “कन्नडीगांचा स्वाभिमान दुखावणाऱ्या उद्योगपतींचा धिक्कार असो ” कन्नडिगांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाच्या एका नेत्याने सांगितले की , …
Read More »मतिमंद मुलीवर अतिप्रसंग केलेल्या “त्या” नराधमाला फाशी द्या : कडोली येथील मुस्लिम समाजाची मागणी
बेळगाव : कडोली येथील मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लीम समाजातील तरुणाला फाशी द्यावी, अशी मागणी कडोलीच्या समस्त मुस्लिम समाजाने केली आहे. मतिमंद तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडोली येथील मुस्लीम बांधवांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. कडोली गावातील …
Read More »युवकाच्या खून प्रकरणी सहा युवकांना जन्मठेप
बेळगाव : 2 वर्षांपूर्वी खासबाग येथे क्षुल्लक कारणातून युवकाचा खून केल्याप्रकरणी सहा युवकांना जन्मठेपेची शिक्षा चतुर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी सुनावली आहे. महेश ज्ञानेश्वर कामन्नाचे (वय 35, रा. तारीहाळ रोड, विजयनगर, हलगा) या तरुणाचा 13 मे 2022 रोजी खासबागमधील जुना पीबी रोडवरील धाकोजी हॉस्पिटलसमोर …
Read More »लक्ष्मण कंग्राळकर लिखित “हेचि माझे सुख” पुस्तकाचे बेळगावच्या सर्व ग्रंथालयांना वितरण
बेळगाव : माजी निवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण कंग्राळकर यांचे ‘हेचि माझे सुख” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांनी आपल्या या नवीन पुस्तकाच्या प्रति बेळगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रंथालयांना वितरित केल्या. बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयामध्ये कानडी पुस्तक उपलब्ध आहेत. पण या ग्रंथालयामध्ये मराठी पुस्तकांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील वाचकांना मराठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta