Sunday , July 26 2026
Breaking News

लक्ष्मण कंग्राळकर लिखित “हेचि माझे सुख” पुस्तकाचे बेळगावच्या सर्व ग्रंथालयांना वितरण

Spread the love

 

बेळगाव : माजी निवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण कंग्राळकर यांचे ‘हेचि माझे सुख” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांनी आपल्या या नवीन पुस्तकाच्या प्रति बेळगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रंथालयांना वितरित केल्या. बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रंथालयामध्ये कानडी पुस्तक उपलब्ध आहेत. पण या ग्रंथालयामध्ये मराठी पुस्तकांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील वाचकांना मराठी पुस्तके वाचावयास मिळत नाहीत त्यामुळे ग्रंथालयांमध्ये मराठी पुस्तके मिळावीत अशी वाचकांची मागणी आहे. त्यासाठी तारांगण या महिला व्यासपीठने पुढाकार घेऊन अनेक ग्रामपंचायतींच्या वाचनालयाना मराठी पुस्तके उपलब्ध करून देत आहेत. तारांगण सदस्यांनी लक्ष्मण कंग्राळकर यांच्या कन्या विद्या तोपिनकट्टी यांच्याशी संपर्क साधून ग्रंथालयाना पुस्तक उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली. लक्ष्मण कंग्राळकर यांनी आपली पुस्तके जिल्हा ग्रंथालय असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य बाळू जायनाचे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी विद्या तोपिनकट्टी, रेखा कंग्राळकर तारांगणच्या सदस्या माजी मुख्याध्यापिका प्रतिभा सडेकर उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *