बेळगाव : व्हॅक्सिन डेपो मैदानावरील खडक गल्ली येथील श्री स्पोर्ट्स क्लब आयोजित तिसऱ्या श्री चषक जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळण्यात आलेल्या प्रदर्शनीय लढतीत सुपर ओव्हर मध्ये पत्रकार संघाला नमवित पोलीस संघाने श्री चषक पटकावला. पहिल्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हाथवे केबल संघाने सहा षटकात 6 बात …
Read More »श्री समादेवी पालखी उत्सवाला प्रारंभ
बेळगाव (प्रतिनिधी) : समादेवी गल्लीतील समादेवीच्या जयंत्युत्सवाला आज शुक्रवारी भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सकाळी चौघडा, काकड आरती, श्रीला महाभिषेक, श्रीला मिष्टान्न व महानैवेद्य, ओटी भरणे, असा भरगच्च कार्यक्रम उत्सवात पार पडला. श्रीला अभिषेक झाल्यानंतर रामकृष्ण अवलक्की या पुरोहित्याच्या मार्गदर्शनाखाली महाआरती करण्यात आली. संस्थेचे ट्रस्टी मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, दीपक …
Read More »इस्कॉनतर्फे 7 दिवसांचा भगवद्गीता अभ्यासवर्ग
बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे शनिवार दि. 4 ते 10 फेब्रूवारी हे 7 दिवस भगवतगीता अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यन्त हिन्दी व इंग्रजी भाषेत आणि 11ते 16 फेब्रूवारी दरम्यान …
Read More »विमल फाउंडेशनच्या वतीने 5 फेब्रुवारी रोजी भव्य चित्रकला स्पर्धा
बेळगाव : श्री. किरण जाधव संचलित विमल फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने “आझादी का अमृत महोत्सव” निमित्त रविवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी शाळांमध्ये भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव हे विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच सामाजिक …
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना आवाहन
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने प्रतिवर्षी दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनामध्ये सन्मानित करण्यात येत असते, त्यासाठी विद्यार्थ्यांना साहित्य संघाच्या वतीने अवाहन करण्यात येते की, गतवर्षी दहावी परीक्षेत श्री शिवाजी विद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय त्याचबरोबर मराठी विषयात केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच मराठी …
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या कथाकथन स्पर्धा 10 फेब्रुवारी रोजी
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने प्रतिवर्षी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते, यावर्षीचे 18 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार( ता.19) फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी साहित्य संघाच्या वतीने शुक्रवार (ता. 10) रोजी सकाळी 11-00 वाजता श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर या ठिकाणी कथाकथन स्पर्धेचे …
Read More »राकसकोप बससेवा सुरळीत करावी; विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात
बेळगाव : राकसकोप बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बरेच दिवस झाले राकसकोप बस राकसकोप गावामध्ये न जाता बेळगुंदीमधून परत बेळगावला बस चालक घेऊन जात आहे, अशी तक्रार विद्यार्थी करत आहेत. कारण बससेवा व्यवस्थित नसल्या कारणामुळे विद्यार्थी शाळा व कॉलेजला वेळेवर …
Read More »श्री श्री रविशंकर यांचा 6 फेब्रुवारीला आध्यात्मिक कार्यक्रम
बेळगाव : आध्यात्मिक गुरुजी श्री श्री रविशंकर यांचा सोमवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता क्लब रोडवरील, सीपीएड मैदानावर आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक महेश केरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे हा कार्यक्रम होणार आहे. १४ वर्षांनंतर बेळगावला भेट देत असलेले जागतिक आध्यात्मिक गुरुदेव श्री …
Read More »विष प्राशन करून तरुणीची आत्महत्या; लव्ह जिहादचा संशय
अथणी : प्रेमभंग झाल्याने नैराश्येतून एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. अथणी तालुक्यातील तावंशी गावातील 21 वर्षीय तरुणीला प्रियकराने लग्नास नकार दिल्याने कीटकनाशक प्राशन करून तरुणीने आत्महत्या केली आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. 21 वर्षीय तेजस्विनी गंगाप्पा गुजर हिने आत्महत्या केली. याबाबत सविस्तर …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने राष्ट्रीय रोजगार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने राष्ट्रीय रोजगार दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी येळ्ळूर येथील फुटूक तलाव याठिकाणी महिला व पुरुष रोजगारांना येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते आइस्क्रीम व चॉकलेट देऊन रोजगार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta