Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावचे सुवर्ण विधानसौध सज्ज

बेळगाव :   तब्बल दोन वर्षानंतर बेळगावच्या हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवार दिनांक 13 डिसेंबर पासून सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान कोरोना संसर्गाची धास्ती घेत काटेकोर नियमांच्या अंमलबजावणीत बेळगावात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. महामारीच्या काळातील हे …

Read More »

शिवसंदेश भारत पंचरत्नांचा शिवाज्ञा सत्कार सोहळा थाटात संपन्न

मराठी तरुणाने उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे : महादेव चौगुले बेळगाव (रवींद्र पाटील) : आशादायी व प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा सत्कार करणे हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे. सत्कार्य व कर्तृत्वान व्यक्तींच्या पाठीवरती ही कौतुकाची थाप देवून प्रोत्साहन देणे तसेच गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करून गौरव करणे हे आजच्या काळाची गरज असून ही शिवाज्ञा आहे, …

Read More »

श्री रेणुकादेवी पोर्णिमेची यात्रा रद्द

भाविकांची गर्दी वाढल्यास मंदिराचे दरवाजेही होणार बंद, जिल्हा प्रशासनावतीने खबरदारी बेळगाव : महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्ण वाढू लागल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. त्यामुळेच 19 डिसेंबरला होणार्‍या सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची पोर्णिमा यात्रेसह बेळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव, महोत्सव, धार्मिक विधी आदीं कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध लादले आहेत. शनिवार दिनांक 19 डिसेंबरला …

Read More »

महामेळावाच्या पार्श्वभूमीवर डेपो परिसराला पोलिसांचा वेढा

बेळगाव : बेळगावच्या सुवर्णसौध येथे उद्या सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. महामेळाव्यासाठी गेल्या सप्ताहभरापासून शहर आणि तालुक्यात समितीचे कार्यकर्ते जनजागृती करत आहेत. दरम्यान टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याची पोलीस प्रशासनाने …

Read More »

सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड

बेळगाव : आर. पी. डी. महाविद्यालयाचा विद्यार्थी सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर क्रॉस येथील स्पोर्ट्स हॉस्टेलच्या सभागृहात सरस्वती पदवीपूर्व कॉलेज आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत सक्षम जाधव याने सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरावर मजल मारली आहे. बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र …

Read More »

शिवाजीनगर परिसरात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित महामेळाव्याची जागृती बैठक आज शनिवार रोजी शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शिवाजी मंडोळकर होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी 2006 पासून कर्नाटकी अधिवेशनाच्या विरोधात समिती मार्फत महामेळावा भरविला जातो आणि बेळगाववर आपला अधिकार सांगणार्‍या शासनाचा या मार्फत …

Read More »

बाग परिवारतर्फे काव्य वाचनाचा कार्यक्रम संपन्न

बेळगाव : बाग परिवार यांच्यावतीने नुकताच काव्य वाचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्पलेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कॉ. कृष्णा शहापूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. आनंद कानविंदे आणि निपाणीचे प्रसिद्ध कवी किरण मेस्त्री उपस्थित होते. प्रारंभी दल …

Read More »

महामेळाव्याला बेळगाव जिल्हा शिवसेनेकडून जाहीर पाठिंबा

बेळगाव : बेळगावमध्ये होणार्‍या कर्नाटकी विधानसभेच्या अधिवेशनाचा निषेध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भरविण्यात येणार्‍या मराठी भाषिक महामेळाव्याला बेळगाव जिल्हा शिवसेनेने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानावर 13 डिसेंबर रोजी होणार्‍या महामेळाव्याला बेळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव जिल्हा शिवसेना …

Read More »

‘भव्य काशी-दिव्य काशी’ लोकार्पण एलईडी स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ‘भव्य काशी-दिव्य काशी‘ काशी विश्वनाथ धाम प्रकल्प देशाला लोकार्पण करणार आहेत. तो कार्यक्रम एलईडी स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था भाजपतर्फे करण्यात आली आहे असे राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली यांनी सांगितले. शनिवारी बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली म्हणाले, मोदी यांनी पंतप्रधान …

Read More »

जुने बेळगाव येथील निराश्रितांकरिता आरोग्य तपासणी

बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रेया सव्वाशेरी या निराश्रित केंद्रातील निराश्रितांकरिता सतत कार्य करीत आहेत. जुने बेळगाव येथील निराश्रित केंद्रातील सदस्यांचे व्हॅक्सिनेशन झाले नव्हते. केंद्राचे प्रमुख शंकर मधली यांनी विश्वनाथ सव्वाशेरी यांना संपर्क साधून व्हॅक्सिनेशन करीता सांगितले असता श्रेया सव्वाशेरी यांनी प्रियंका उंडी ज्युनिअर हेल्थ ऑफिसर फीमेल यांच्याशी संपर्क …

Read More »