कामगारांनी निवेदनातून मांडली कैफियत कागल (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील “मार्व्हलस मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड” ही कंपनी सुरू करण्यासाठी लवकरच कंपनीच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देणार असल्याचे भाजपाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. बंद पडलेली कंपनी लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी कंपनीच्या कामगारांनी …
Read More »शिक्षकांनो…… शाळा ही मंदिरे आहेत संघटितपणे काम करा…! : शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे आवाहन
नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात कागल (प्रतिनिधी) : शिक्षकानो शाळा ही ज्ञानाची पवित्र मंदिरे आहेत. संघटितपणे काम करा आणि ज्ञानाधिष्ठित पिढ्या निर्माण करा, असे आवाहन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनचे सर्वच उपक्रम समाजोपयोगी आणि विधायक आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी …
Read More »काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
शेतीसह गावांना पिण्याचे पाणी आणि कोल्हापूर शहरालाही मिळणार स्वच्छ व मुबलक पाणी कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या हरितक्रांतीची वरदायिनी असलेले काळम्मावाडी धरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अस्मिता जणू. या धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये निधी मंजूर झाला …
Read More »हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने २२ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
कागलमध्ये खास समारंभात होणार पुरस्कार वितरण कागल (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व कागल तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्यावतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे वितरण 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता मटकरी …
Read More »उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे घेतले दर्शन
कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन कोल्हापूर येथे घेतले. त्यांनी मंदिरात विधिवत पूजा करून परिसरातील व्यवस्थेबद्दल पाहणी केली. देवस्थान समितीच्या कार्यालयात भेट देऊन नवरात्र महोत्सवा दरम्यान केलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी …
Read More »सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन कारखान्याच्या दहाव्या गळीताचा बॉयलर प्रदीपन उत्साहात कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे या गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या दहाव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी …
Read More »नेहमी गोरगरीब, कष्टकरी माणूस केंद्रबिंदू मानूनच काम केले : पालकमंत्री हसन मुश्रीफ
बेळुंकी येथे अडीच कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण कागल (प्रतिनिधी) : गेल्या पंचवीस -तीस वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत गोरगरीब, सर्वसामान्य, कष्टकरी माणूस केंद्रबिंदू मानून काम केले आहे. मी जो मतदार संघात विकास केला आहे. तसा विकास बारामती सोडून कोणत्याच मतदारसंघात झालेला नाही. मतदारसंघात एक इंचही रस्ता डांबरीकरण विना राहिला नाही, असे …
Read More »एम. पी. पाटील यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट व्यवस्थापन चेअरमन पुरस्कार’ प्रदान
कागल (प्रतिनिधी) : राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील यांना नवभारत नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड 2023 यांच्यावतीने दिला जाणारा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट व्यवस्थापन चेअरमन पुरस्कार’ मिळाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आला. याबद्दल …
Read More »कुरुंदवाडात ऊस आंदोलनाची ठिणगी; स्वाभिमानीने गुऱ्हाळाकडे निघालेला ट्रॅक्टर अडवला
कुरुंदवाड : गत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दसऱ्यापूर्वी आणखी ४०० रुपये द्यावेत. या वर्षीच्या हंगामाचा ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करायची नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. कुरुंदवाड येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्यातील काडापूर (ता.चिकोडी) येथून शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील गुऱ्हाळ घराकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर अडवला. …
Read More »रविवारी कागलमध्ये दसरा महिला महोत्सव
नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरातील महिलांसाठी रविवार दि. ८ रोजी दसरा महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना अडीच लाखांची साडेसहाशे बक्षीस देण्यात येणार आहेत. …
Read More »