बंधारे पाण्याखाली, दोन घरांची पडझड चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यात काल बुधवार दिवस रात्र व गुरुवारी झालेल्या संततधार पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली आले आहेत, तर दोन ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच चंदगड-गडहिंग्लज मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद झाला. संततधार पावसाने चंदगड तालुक्यात जनजीवन विस्कळित झाले. गुरुवार …
Read More »कोल्हापुरात पावसाची संततधार; पंचगंगा नदी पात्राबाहेर
कोल्हापूर : जूनच्या पंधरावड्यातच आज पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आज दुपारी चार वाजता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३० फूट ३ इंचापर्यंत वाढ झाली. काल याचवेळी ही पातळी केवळ १३ फूट होती. चोवीस तांसात ही पातळी १७ फुटांनी वाढली आहे. आज पंचगंगा नदीचे घाटावरून पाणी पात्रा …
Read More »चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो
चंदगड : चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. या धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस कोसळतो. आज या धरणात १०० टक्के पाणी भरले असून, धरणाच्या पूर्वेकडील सांडव्यावरून ७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे. तर पॉवर हाऊस येथून ९०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणावर …
Read More »मराठा आरक्षण : सरकार चर्चा करायला तयार; सतेज पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वांचीच आग्रहाची मागणी आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्याआधी समाजाला ज्या सुविधा मिळायला हव्यात त्याबाबत चर्चा करण्यासाठी संभाजीराजे तुम्ही मुंबईला या, मी तुमची भेट मुख्यमंत्र्यांशी घालून देतो. चर्चेने प्रश्न सोडवू, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी केले. ते मराठा मूक …
Read More »कोल्हापूर : मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न : शाहू छत्रपती महाराज
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाला सोबत घेतलं पाहिजे. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी कोल्हापुरात मूक आंदोलन झालं. हा आवाज निश्चित मुंबईपर्यंत जाईल. मराठा समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील ४८ खासदारांसह राज्य सरकारने हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा, अशी अपेक्षा शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापुरात व्यक्त …
Read More »कोरोना वाढीचा आलेख कमी करण्यासाठी ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा : जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अधिक संख्येने आहेत. या तालुक्यातील रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या अधिक जाणवते तरीही अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी नाऊमेद न होता या तालुक्यांसमवेत जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील वाढत्या …
Read More »आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेणूगोपाल पतसंस्थेमार्फत साहित्य वाटप
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वेणूगोपाल पतसंस्थेमार्फत कानुर आरोग्य केंद्र, स्टीफन कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना व डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांना फळे, बिस्किट, ORS, सॅनिटायझर, मास्क, पाणी बाटली इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.सामाजिक उपक्रमात संस्था नेहमी अग्रेसर असून मागील वर्षीही …
Read More »आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माणगांव येथे जीवनावश्यक रेशन धान्य किट वाटप…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गावोगावी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जीवाचा धोका पत्करुन तूटपूंज्या मानधनावर अथक परिश्रम घेत असणाऱ्या आशा सेविका यांना आज आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजेशदादा युवा मंच यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, माणगांव येथे सर्व आशा सेविका व आरोग्यसेविका यांना जीवनावश्यक रेशन धान्य किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी …
Read More »मराठा कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट
कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार स्पर्धा परीक्षेनंतर नेमणूक झालेल्या २१८५ उमेदवारांना राज्य सरकारने त्वरित नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे. यासाठी राज्य सरकारने पावलं न उचलून मराठा समाजावर अन्याय केला आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना सकल मराठा समाज्याच्यावतीने त्यांच्या समोर निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. …
Read More »कोलेकर महाविद्यालय नेसरीच्या आंतरराष्ट्रीय ई-चर्चासत्रात देश – विदेशातून ६९० जणांचा सहभाग
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नेसरीसारख्या ग्रामीण भागातील कोलेकर महाविद्यालयाने हिंदी भाषेत आंतरराष्ट्रीय ई- चर्चासत्राचे आयोजन करणे गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के यांनी केले. येथील शिक्षण समिती कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय व सृजन ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय ई- पत्रिका, …
Read More »