Sunday , December 7 2025
Breaking News

चंदगड

घटप्रभा मध्यम प्रकल्पातील सर्व पाणी नदिपात्रात सोडणार, कर्नाटक व चंदगडच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा

तेऊरवारी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, HA चंदगड पाटबंधारे उपविभाग यांच्याकडून घटप्रभा मध्यम प्रकल्प (ता. चंदगड) जि. कोल्हापुर प्रकल्पाचे Emerganey Gate, Stop Log Gate व Service Gate यांचे अत्यावश्यक दुरुस्ती व प्रकल्पावरिल इतर अनुषांगिक दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून या प्रकल्पातून दि. १६ एप्रिल ते दि. ५ मे …

Read More »

चंदगडच्या दौलतवर लिहा अन साखर जिंका

ॲड. रवि रेडेकर यांच्या गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टकडून दौलत विषयावर लेखन स्पर्धा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : दौलत साखर कारखाना म्हणजे चंदगडी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आणि चंदगडी जनतेच्या अस्मितेचा विषय. अनेकांच्या लेखणीतून वेळोवेळी मांडला गेलेला एक ज्वलंत विषय…! अर्थात, दौलत साखर कारखान्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा त्याच्या प्रवासात नेमक्या कोणत्या घटना – घडामोडी व …

Read More »

संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल समृद्ध कांबळे याचा आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते गौरव

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : बालपणापासून संगीत क्षेत्रात उत्तुंग असे कार्य केलेल्या समृद्ध राजाराम कांबळे (मूळगाव कोरज, ता. चंदगड) सद्या राहणार नेसरी याचा सत्कार चंदगड तालुक्याचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. चंदगडी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात हा गौरव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर सन्मान संगीत कार्यातील …

Read More »

धावड काम करता करता मुलाचा शाळेचा अभ्यास घेणारी पाटणे फाट्यावरील माता; बापूसाहेब शिरगावकरानी दिला मदतीचा हात

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : आज दुपारी पाटणे फाट्यावरुन घरी येत असताना कृष्णा ऑईल मिलच्या समोर पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे धावड काम करणार्‍या झोपडीकडे बापूसाहेब शिरगावकर, जिल्हाध्यक्ष – अखिल भारतीय मानवाधिकार संघटन यांचे अचानक लक्ष गेले. समोरील दृष्य पाहून त्यांचा गाडीचे ब्रेक आपोआप दाबले गेले. समोर दृष्य होते ते …

Read More »

दि. चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्सची नुतन कार्यकारिणी जाहिर, अध्यक्षपदी अर्जुन पाटील

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची नुतन कार्यकारिणी नुकतीच संघटनेच्या बैठकीत जाहिर करण्यात आली. अध्यक्षपदी अर्जुन पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष -सतीश सावंत, मोनाप्पा पाटील, सचिव -दत्तात्रय पाटील, खजिनदार – सागर नेसरकर, संचालक -शामराव बेनके, शेखर पाटील, विजय …

Read More »

निट्टूरच्या कुस्ती आखाड्यात कर्नाटक केसरी किरण दावणगिरी याने मारले मैदान!

चंदगड (प्रतिनिधी) : गुढीपाडव्यानिमित्त आयोजित 100 वर्षाची परंपरा असलेल्या निट्टूरच्या कुस्ती मैदानात कर्नाटक केसरी किरण दावणगिरी याने सांगलीच्या भोसले व्यायामशाळेच्या सुबोद पाटील याला अस्मान दाखवत मनाची गदा पटकावली. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील व विष्णु जोशिलकर यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले. यावेळी कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीचा मल्ल अरुण बोंगाळे व रत्नकुमार मठपती …

Read More »

देवरवाडी येथील मागासवर्गीय स्मशानभूमीत बोअरवेलच्या कामात यश

शिनोळी : वैजनाथ देवरवाडी गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून चंदगड पंचायत समिती सदस्या सौ. रुपा भैरु खांडेकर यांच्या हस्ते मागासवर्गीय स्मशानभूमीमध्ये बोअरवेलचे उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच गितांजली सुतार, उपसरपंच गोविंद आडाव, ग्रामपंचायत सदस्या मंजुळा कांबळे, प्रभावती मजुकर, मनिषा भोगण तसेच देवरवाडीतील समाजकार्यात अग्रेसर असणारे ग्रामस्थ राजाराम करडे, …

Read More »

हुंदळेवाडीत उभारली आगळी वेगळी गुढी, गुढी पुस्तकांची गुढी विचारांची

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गुढी पुस्तकांची गुढी विचारांची या संकल्पनेअंतर्गत आज प्रा. रविंद्र पाटील हुंदळेवाडी (ता. चंदगड) यांच्या घरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. यावेळी पुस्तकांची गुढी उभा करून वाचन संस्कृती, वाचनाचे महत्त्व, व्हाट्स अ‍ॅप व इंटरनेटच्या विळख्यात अडकलेली तरुणाई, तरूणांमध्ये मोबाईलमुळे निर्माण झालेले एकटेपण, दिवसेंदिवस …

Read More »

निट्टूर (ता. चंदगड) येथे उद्या कुस्ती मैदान!

दौलत हलकर्णी (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे गुढीपाडव्या निमित्त निट्टूर (ता. चंदगड) येथे गावामध्ये लाल मातीच्या कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे कुस्त्यांचे फड बंद होते. यावर्षी निट्टूर ग्रामस्थ तालीम मंडळाच्या वतीने गुडीपाडव्यानिमित्त शनिवार दि. २ रोजी श्री नरसिंह देवालयाजवळील भव्य मैदानात कुस्त्यांचे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकासाठी सांगलीच्या …

Read More »

मुगळी येथे नवीन रस्ता खचला; पडले भले मोठे खड्डे निकृष्ट दर्जाचे काम; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुगळी (ता. चंदगड) येथे दोन ते तिन दिवसापूर्वी दलितवस्तीमध्ये केलेला नवीन डांबरी रस्ता खचला आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाला जबाबदार कंत्रादारांकडून हे काम अर्धवट झाले असून त्यावर ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा …

Read More »