गेल्या वर्षभरापासून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांच्या लढ्याला यश. चंदगड : देवरवाडी गावात सुरू असलेले अनेक भोंगळ कारभार लपविण्यासाठी ग्रामसभा न घेण्याचे महानाट्य रचण्यात येत होते, ग्रामपंचायत अधिनियम नुसार गावात ग्राम सभा घेण्याचा नियम असून सुद्धा टाळाटाळ करून ग्रामसभा घेण्यात आली नाही तर या …
Read More »विद्यामंदिर शिनोळी बु. शाळेला जॉर्ज क्रूझ यांची सदिच्छा भेट
शिनोळी बु., : विद्यामंदिर शिनोळी बु. शाळेला प्रसिद्ध शिक्षणतज्ञ प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, वाचन चळवळ, स्पर्धा परीक्षा आणि आनंददायी शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. क्रूझ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या “वाचन चळवळीचे महत्त्व” अधोरेखित केले. त्यांनी सांगितले …
Read More »शिनोळी येथे ‘स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन शालेय जीवनात कसा वाढवावा’ या विषयावर प्रा. जॉर्ज क्रूझ यांचे सखोल मार्गदर्शन
शिनोळी (रवी पाटील) : शिनोळी येथील समाज मंदिर येथे ‘शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन कसा वाढवावा’ या विषयावर एक सखोल मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ते प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे महत्त्व, पालकांची भूमिका आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्या यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिनोळी …
Read More »शिनोळी बु. येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न
शिनोळी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम शिनोळी बुद्रुक, ता. चंदगड – 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनानिमित्त ग्राम पंचायत शिनोळी बु.च्या वतीने विविध शाळांतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सरपंच गणपत कांबळे यांनी भूषविले, तर उपसरपंच पुंडलिक गवसेकर यांनी नवीन शैक्षणिक संकल्पनांचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात विद्या मंदिर …
Read More »शिक्षक समाज घडवतात : राघवेंद्र इनामदार यांना मराठी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
चंदगड : “शिक्षक समाज घडवतात, मुलांवर संस्कार करून चारित्र्यवान पिढी तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात,” असे विचार मराठी अध्यापक संघाचे एम. एन. शिवणगेकर यांनी व्यक्त केले. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे दरवर्षी तालुक्यातील एका मराठी शिक्षकाला दिला जाणारा “मराठी प्रेरणा पुरस्कार” यंदा राजगोळी हायस्कूलचे शिक्षक राघवेंद्र इनामदार यांना …
Read More »पोक्सो 2012, एक सर्वसमावेशक कायदा : प्रा. डॉ. नागेंद्र जाधव
चंदगड : पोक्सो कायदा, 2012 हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15/3 नुसार लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण करणारा सर्वसमावेशक, व्यापक कायदा असून उद्याची भावी पिढी, त्यांचे योग्य पालन पोषण, संवर्धन व्हावे तसेच बालकाचा निकोप शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा. बालकाचे लैंगिक शोषणापासून संरक्षण व्हावे ह्या मुख्य हेतूने हा कायदा …
Read More »चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची बैठक संपन्न
चंदगड : चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीने आज बैठक तांबुळवाडी कार्यालयामध्ये संपन्न झाली. बैठकीमध्ये तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच संघटित- असंघटित कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. चंदगड तालुका कार्याध्यक्ष मा. जॉनी फर्नांडिस, सचिवपदी मा. आनंद पाटील, खजिनदार पदी मा. वैजनाथ कांबळे व उपाध्यक्षपदी मा. दीपक पवार यांची …
Read More »बांधकाम कामगारावरील अन्यायाविरोधात पाटणे फाटा येथे आमरण उपोषण
चंदगड : शासनाकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र या विविध योजनांचा लाभ, मुख्य, मूळ प्रामाणिक बांधकाम कामगारांच्या पर्यंत पोचविले जात नाहीत, याचे लाभ बोगस लाभार्थी, तसेच काही राजकीय नेते, पक्ष, एजेंट करीत असून आपल्या मर्जीतील बिगर कामगार लोकांना करून देत असून त्याचा परिणाम मूळ बांधकाम कामगार …
Read More »दैनिक महान कार्य चंदगड तालुका प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे यांची पोलिस क्राईम डायरीच्या चंदगड तालुका प्रमुख पदी निवड
चंदगड : इचलकरंजी येथे झालेल्या बैठकीत दैनिक महान कार्य चंदगड तालुका प्रतिनिधी कार्यरत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन संजय इरकल मुंबईचे पोलिस क्राईम डायरीचे सर्वेसर्वा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पांडूरंग पोवार शिरगांव ता. राधानगरी व बेळगांव जिल्हा अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते प्रकाश ऐनापूरे यांना चंदगड तालुका प्रमुख पदी …
Read More »छाया बंबर्गेकर हिचे पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत घवघवीत यश
दड्डी : ता. चंदगड येतील कुदनुर गावची सुकन्या कुमारी छाया सिद्धाप्पा बंबर्गेकर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. घरची परिस्थिती अतिशय बेताची. वडील अशिक्षित शेतकरी पण या परिस्थितीचा बावू न करता तिने जिद्द चिकाटी व अथक परिश्रम करून पहिल्याच प्रयत्नामध्ये पीएसआय पदाला गवसणी …
Read More »