Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र

अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला मोठ यश; माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार!

  कोल्हापूर : अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आले आहे, माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचे आश्वासन वनताराकडून देण्यात आले आहे. वनताराचे सीईओ विहान करणी यांची आज नांदणी मठाच्या महंतांसबोत बैठक पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हत्तीणीला परत कोल्हापूरला आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नांदणी परिसरात माधुरीसाठी घर …

Read More »

माधुरी हत्ती लवकरच नांदणी मठात येईल याचा विश्वास : ललित गांधी

  मुंबई : कोल्हापूरच नव्हे तर पंचक्रोशीतील तमाम जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या महादेवी हत्तीचे लवकरच नांदणी मठात पुनरागमन होईल असा विश्वास जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी येथील बाराशे वर्षाची परंपरा असलेल्या जैन …

Read More »

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार

  मुंबई : महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोग मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. यात नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. …

Read More »

कायद्याच्या चौकटीतून महिलांना योग्य न्याय देण्याचा आयोगाचा निर्धार : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

पोलीस अधीक्षक कार्यालय आढावा बैठकीत प्रतिपादन कोल्हापूर : महिलांच्या प्रत्येक प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीतून त्यांना योग्य न्याय देण्याचा आयोगाचा निर्धार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित महिला तक्रार अर्जदारांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी अर्जदार महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी …

Read More »

नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  गुजरातमधील वनताराकडे जाण्याचा मार्ग मोकळा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या महादेवी हत्तीणीचा अखेर गुजरातमधील वनतारामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे हत्तीणीसाठी केलेल्या प्रयत्नांवर …

Read More »

युवकांना व्यसनातून मुक्त करणे काळाची गरज : माजी आमदार राजेश पाटील

  मलिग्रे येथे सोलर हायमास्ट उद्घाटन सोहळा संपन्न तालुक्यातील झालेला विकास सर्वसामान्य जनतेला माहिती असून युवकांना मात्र विकासाची माहिती न देता केवळ गुटखा, मटका व व्यसनाकडे वळविण्याचे सुरू आहे. त्यासाठी युवकांना व्यसनातून मुक्त करणे व तालुक्यातील झालेल्या विकास कामांची माहिती देणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी आमदार राजेश पाटील …

Read More »

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चा सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. …

Read More »

बदल स्विकारुन माध्यमांचे महत्व वृध्दिंगत करुया; कोल्हापूरच्या पत्रकार कार्यशाळेतील सूर

  कोल्हापूर : माध्यमांमध्ये येत असलेले नवनवे बदल तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी पुढे येत असलेली विविध आव्हाने स्विकारणे काळाची गरज आहे. आपले अस्तित्व अधिक ठसठशीत करण्यासाठी नव्या बदलांचा अविष्कार सकारात्मपणे स्विकारणे गरजेचे असल्याचा सूर आज कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात झालेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागाच्या …

Read More »

विधानभवनाच्या लॉबीतील राड्याचे रात्रभर पडसाद, पोलिसांच्या गाडीसमोरच जितेंद्र आव्हाड यांचे ठिय्या अन्…

  मुंबई : विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळच वळण घेतलंय. जितेंद्र आव्हाड यांनी काल (17 जुलै) रात्री 2 वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात तुफान राडा घालत चांगलाच गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात …

Read More »

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीतच हाणामारी झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याने ही मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल …

Read More »