माणगाव : बेळगाव सीमावादाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील पत्रकारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील इतर तालुक्यांनाही भेट देऊन या मोहिमेला अधिक बळ दिले जाणार …
Read More »समरजीत घाटगेंची पुन्हा भाजप वापसी; मुंबईत 8 एप्रिल रोजी करणार पक्ष प्रवेश
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे यांचा पुन्हा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळू शकल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा समरजीत घाडगे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि …
Read More »नाशिकमध्ये मोटार विहिरीत कोसळून सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू
नाशिक : खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरातील शेतातील विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दिंडोरी येथे घडली. मृतांमध्ये सहा विद्यार्थी व पालकांचा समावेश आहे. विहीर पाण्याने भरलेली असल्याने बचाव कार्यात अडथळे आले. क्रेनच्या साहाय्याने रात्री ही मोटार बाहेर काढण्यात आली. दिंडोरी …
Read More »बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मोहिमेला रायगड पत्रकारांचा जाहीर पाठिंबा
रायगड (नरेश पाटील) : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात 22 वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे दाव्याची सुनावणी जलद गतीने व्हावी यासाठी सरन्यायाधीशांना 1 लाख सह्यांचे निवेदन बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. सदर सह्यांच्या मोहिमेला रायगड जिल्ह्यातून, विशेषतः माणगाव तालुक्यातील पत्रकारांकडून जाहीर पाठिंबा मिळताना दिसत …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची निर्णायक लढाई; रायगडातून सह्यांच्या मोहिमेला गती
रायगड (नरेश पाटील) : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची लढाई आता निर्णायक टप्प्यात आली असून, पत्रकारांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या स्वाक्षरी मोहिमेला राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागला आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो मराठी बांधवांच्या भावनांना आवाज देत ही मोहीम आता अधिक व्यापक स्वरूप धारण करत आहे. बेळगाव येथील “बेळगाव जिल्हा मराठी …
Read More »भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीने बजावला समन्स
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स बजावला आहे. या प्रकरणी त्यांची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका संस्थान या ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. त्यामुळे आता …
Read More »अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई : अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला गुरू मानणाऱ्या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचे …
Read More »इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे : आ. राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (जिमाका) : इराण,अमेरिका – इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे. तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल – डिझेल, गॅस) आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे …
Read More »राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर (जिमाका) : ‘कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्यायाचे प्रमाण कमी असले, तरी हे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने सोबत कंबर कसावी,’ असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अनुसूचित …
Read More »मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत, तृतीय पंथीयासोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत आले आहेत. नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषद घेत केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta