कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट प.पू. १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७० वी पुण्यतिथी महोत्सव जमखंडी जि. बागलकोट येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती समाधिसम्राट प.पू. …
Read More »विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
मुंबई : जळगावमधील एरंडोल तालुक्यातील खेडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खेडी गावाजवळील एका शेतात या पाचही जणांचे मृतदेह आढळले आहेत. शेताकडे जात असताना विजेचा धक्का लागल्याने या सर्वांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली …
Read More »पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा; गरज नसल्यास घराबाहेर पडू नका : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे जिल्हावासियांना आवाहन
पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर …
Read More »तब्बल २१ वर्षांनी मुलगा झाला; बाळाला पाळण्यात ठेवून कृष्णेच्या पात्रात प्रवास करत दाम्पत्याने फेडले नवस!!
सांगली : सांगलीत आज नवस फेडण्याची शेकडो वर्षांची अनोखी प्रथा आज सांगलीकराना पाहायला मिळाली. लग्नाच्या तब्बल २१ वर्षानंतर नवसाने एका दाम्पत्याला मुलगा झाला. याच नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीतील पुराच्या पाण्यात लाकडी पाळण्यामध्ये बाळाला ठेऊन स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत हा दाम्पत्याने नवस फेडले. कोयना धरणातून सोडण्यात …
Read More »भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शाही उद्घाटन समारंभ कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याने ४ मुलांसह आयुष्य संपवले
अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे, बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार मुलांसह आपले जीवन संपवले आहे. अरुण काळे (वय 30 वर्ष) राहणार चिखली कोरेगाव , तालुका श्रीगोंदा असे आत्महत्या केलेल्या या व्यक्तीचे नाव आहे. अरुण काळे यांनी आधी आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून …
Read More »शाहू महाराजांच्या समाजपरोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन; समाधीस्थळाला भेट
कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. तसेच समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला. …
Read More »‘ठरलं तर मग’मधील पूर्णा आजींचे निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. गेल्या ३-४ दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी …
Read More »ऊसाच्या शेतात तीन महिन्यांचे मृत अर्भक पुरलेल्या स्थितीत आढळले!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळदंगेमधील धोंडीबा नानासो फडतारे यांच्या ऊसाच्या शेतात अंदाजे तीन महिन्यांचे अर्भक मृतावस्थेत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळंदगे गावातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. हुपरी पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला असून अर्भक कोणाचं याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर …
Read More »अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला मोठ यश; माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार!
कोल्हापूर : अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आले आहे, माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचे आश्वासन वनताराकडून देण्यात आले आहे. वनताराचे सीईओ विहान करणी यांची आज नांदणी मठाच्या महंतांसबोत बैठक पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हत्तीणीला परत कोल्हापूरला आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नांदणी परिसरात माधुरीसाठी घर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta