चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील शिवकन्या संस्कृती सागर खराडे (वय वर्ष-१ वर्ष ३ महिने) यां चिमुकलीचा संस्कारी व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
कन्या ही घरची लक्ष्मी समजली जाते. तिच्या जन्मामुळे घर हें उजळून निघत असत. आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला-पुरुष जनन दरामध्ये कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर आहे. अश्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिलांवर्ग नेहमी आपल्या कार्यानी सक्रिय असतो. आज आपण एका खराडे कुटुंबीयांतील चिमुकली शिवकन्या संस्कृतीच्या सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओची माहिती घेणार आहोत.
कोल्हापूर येथील उजळायवाडी येथील सागर खराडे यांची चिमुकली कन्या संस्कृती हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अवघ्या वयाची दिड वर्षही न ओलांडलेली मुलगी ही व्हिडीओमधून घरांतील सर्व कामे करताना दिसत आहे. जन्मतःच तिला मिळालेले बाळकडू व तिला असलेली आवड या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत असून सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला आला असून कमी कालावधीत जास्त व्ह्यूज मिळवले असून 11 हजारचा टप्पा तिच्या अन्य व्हिडीओने पार केला आहे.