चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गोवा बनावटीच्या दारू अड्ड्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकत त्याच्याकडून १० हजार ७२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण वैजू समेमारे (रा.माणगाव ता. चंदगड) याला अटक करण्यात आली असून ही कारवाई रविवारी (दि. २२ जुलै २०२१ रोजी) पावणेपाचच्या सुमारास केली आहे.
आरोपी लक्ष्मण वैजू समेमारे याने स्वतःचे फायद्याकरीता बेकायदा बिगर परवाना बेकायदा गोवा बनावटीचा प्रोव्ही गुन्ह्याचा १० हजार ७२० रुपये किंमतीचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचा कर चुकवुन बेकायदेशीररित्या विक्रीकरिता साठवला होता. याबाबतची फिर्याद पोना वैभव गवळी यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस जाधव व पोलिस किल्लेदार करत आहेत.