चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कानूर बु. येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडपडी आणि घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बुधवारी (दि.२१ जुलै २०२१ रोजी) सकाळी ९ वाजता कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारचे नुकसान झाले आहे. तर दुपारी १ वाजता धोडीबा शिवराम गावडे यांच्या घरावर झाड पडुन रू. १ लाखाचे नूकसान झाले असून मारूती आप्पा नाईक यांच्या घराची भिंत कोसळून २० हजारांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा पंचनामा कानूर बुद्रुकचे तलाठी खूपसे, पोलीस पाटील अशोक मटकर, कोतवाल व ग्रामपंचायत सरपंच तसेच कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तरी या शेतकरी बांधवांना लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
Check Also
चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध
Spread the love गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …