Sunday , December 7 2025
Breaking News

दोडामार्ग-कोल्हापूर बसला हुनगीनहाळ नजिक अपघात, दोन प्रवासी जखमी

Spread the love

चालकाच्या प्रसंगावधानामुळे इतर प्रवासी सुखरूप

तेऊरवाडी (एस.के. पाटील) : चंदगड -गडहिंग्लज या राज्यमार्गावरहुन नगीनहाळ (ता. गडहिंग्लज) गावाजवळील ओढ्यानजीक रस्त्याकडेला पडलेल्या झाडाला चुकविताना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर आगारातील दोडामार्ग-कोल्हापूर (बस क्रमांक एमएच -१४, बीटी,०५०९) या बसला अपघात झाला. बस झाडावर आदळल्याने दोन प्रवासी जखमी झाले. आज (शनिवारी दि. ०६ ऑगस्ट रोजी) सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. चालक रणवीर काशिनाथ जुगदार (रा.कोल्हापूर) यांच्या प्रसंगावधानाने ३७ प्रवाशांचे प्राण वाचले.

गडहिंग्लज – चंदगड मार्गावर हुनगिनहाळ गावाजवळ पावसाने रस्त्यावर झाड उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला होता. याची कल्पना येताच बस चालकाने प्रसंगावधान राखत एस.टी बाजूला घेतली. मात्र, झाड चुकविताना बस च्या समोरील बाजूला झाडाच्या फांद्या घुसल्या. पण चालकाने प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी केल्याने बसमधील इतर प्रवाशांना कोणतीही इजा पोहचली नाही. मात्र बसच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाने दाखवलेल्‍या प्रसंगावधानामुळे प्रवाशांतून त्‍याचे कौतुक होत आहे.
या अपघातात स्नेहल शशिकांत पाटील (वय- ५७ , रा. कोळीन्द्रे, ता.चंदगड) व माधुरी मारुती केसरकर (वय-३५, रा. नेसरी) या दोन महिला प्रवासी जखमी झाल्या. बसमधील अन्य प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर

Spread the love  चंदगड : चंदगड तालुका डायग्नोस्टिक सेंटर मजरे कर्वे, (ता.चंदगड जि.कोल्हापूर) संस्थेची वार्षिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *