तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापूर पोलिस दलातील १२ अधिकारी व ठाणे अंमलदार यांनी आज दि. १४ ऑगस्ट रोजी गडहिंग्लज उपविभागात सायकल रॅली काढून स्वातंत्र्याचा जयघोष केला. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे या पोलिस दलाच्या सायकल रॅलीचे स्वागत नेसरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटील यांनी केले, सरपंच आशिष साखरे यांनी केले.
सध्या देराभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कोल्हापूर पोलिस दलही पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवत आहे. या सर्वाना होम डीवायएसपी पाटील मॅडम, पोलिस मुख्यालयातील राखीव पो. निरीक्षक माशाळकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या उपकमाचा एक भाग म्हणून कोल्हापूर पोलिस दलातील १२ अधिकारी व ठाणे अंमलदार यानी गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण कोल्हापूर जिल्हातील सर्व पोलिस स्टेशन विभागात सायकल रॅली काढली. रोज एक विभाग व ७५ कि. मी.चा सायकलवरून या पोलिस दलाने प्रवास करत भारतमातेचा स्वातंत्र्याचा जयघोष केला. आज या सायकल रॅलिने गडहिंग्लज, नेसरी, चंदगड, आजरा व भुदरगड असा सायकल दौरा पूर्ण केला. नेसरी येथे या रॅलीचे स्वागत नेसरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटील, सरपंच आशिष साखरे, मंडल अधिकारी संजय राजगोळे, कार्तिक कोलेकर, सचिन हल्याळी, एस. एन. देसाई, प्रशांत नाईक, आकाश दळवी आदि मान्यवरानी केले. नेसरी पोलिस स्टेशनच्या वतीने सर्व सायकल स्वाराना फळे व पाण्याचे वाटप सहा. पो.निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी या मोहिमेतील अधिकारी संदिप जाधव यानी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य सर्व शुरविरांना मानवंदना देवून स्वातंत्र्याची जनजागृती करण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी नेसरी पोलिस स्टेशनचा पूर्ण स्टाफ, नेसरी व नेसरी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.