Friday , November 22 2024
Breaking News

कोवाड महाविद्यालयात शहीद जवानांचा गौरव समारंभ संपन्न; पो.निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते सन्मान

Spread the love

 

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथे आजादी का अमृत महोत्सवानिमित्त शहीद जवानांच्या कुटंबाच्या वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांचा गौरव सोहळा बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाविद्यालयात बी. आर. पाटील उपाध्यक्ष, सर्वोदय शिक्षण संस्था यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे संतोष घोळवे, पोलीस निरीक्षक चंदगड पोलीस ठाणे आणि संस्था पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना पो.निरीक्षक संतोष घोळवे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीर जवानांनी आत्मसपर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण अमृत महोत्सव साजरा करू शकलो. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आजही आपले वीर जवान जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करत आहेत. याच कार्यात असताना अनेक वीर जवान शहीद झालेले आहेत. त्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे, आणि ऊर्जा मिळावी तसेंच त्यांचे कार्य सर्वांना आदर्श म्हणून तेवत राहावे, हा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाल्याबद्दल सर्व वीर जवानाच्या कुटूंबांना सलाम करून आपल्या वीर जवांनाच्या कार्याचा गोडवा गायला. यावेळी चंदगड, गडहिंग्लज, बेळगाव परिसरातील देशासाठी अनेकानी हौतात्म्य पत्करलेल्या या वीर जवानांच्या 15 कुटुंबाचा यथोचित गौेरव, सन्मान पो.नि. संतोष घोळवे यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. वीर जवानांच्या कुटूंबातील वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेंच कुटुंबातील, परिवारातील सदस्य उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण बी.आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.मोहन घोळसे तर आभार डॉ. ए. के. कांबळे, प्रस्ताविक डॉ. दीपक पाटील यांनी केले आहे. तर स्वागत प्र. प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील यांनी केले. यावेळी शाहू फर्नांडिस, गोविंद प्रभू पाटील, बी.के.पाटील, याकूब मुल्ला, जोतिबा वांद्रे, नरसु बाचूळकर, नेसरकर मामा, सर्व शहीद जवानांचे नातेवाईक तसेंच सर्व विभागातील प्राद्यापक, सेवक कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. बीए भाग एकच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायले तर स्वागत गीत बी कॉम भाग एकच्या विद्यार्थिनींनी सादर केले.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध

Spread the love  गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *