Thursday , September 19 2024
Breaking News

जीवनात यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धीमत्ता आवश्यक : पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी

Spread the love

जागृती प्रशालेत गुणवंतांचा सत्कार संपन्न

तेऊरवाडी (एस.के. पाटील) : जागृती प्रशाशाला (गडहिंग्लज) येथे एस.एस.सी. मार्च 2022 परीक्षेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरचे अधीक्षक डॉ. दिनेश बारी तर डॉ. राजश्री नागेश पट्टणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी स्वागत केले. सौ. आर. बी. मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. संपत सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
डॉ. दिनेश बारी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, निसर्गसंपन्नता व नामवंत लेखकांची भूमी म्हणून गडहिंग्लज, आजरा, चंदगड या परिसराची मला एक वेगळेच आकर्षण राहिले आहे. इकडे येणे माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे. ते पुढे म्हणाले, आवडीच्या क्षेत्रात कर्तुत्वाला बहर येतो. यासाठी शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता व आवड ओळखून मार्गदर्शन करणे गरजेचे असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी बुद्धयांक स्तर म्हणजेच तार्किक क्षमता याबरोबरच भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची असते. कर्तुत्व दाखवण्याकरिता आभियांत्रिकी, वैद्यकीय, एमपीएससी, यूपीएससी, प्रमाणेच रोबोटिक्स, डाटा सायन्स, ॲग्री सारख्या क्षेत्रात अनेक मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
डॉ. सतीश घाळी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच निकालाच्या गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी पार्श्व निकम, प्रेरणा शिंदे, हर्षिता देसाई, मयुरी शिखरी, प्रणय दळवी, तन्मय धनुकटे, गजानन चिंचेवाडी, शंतनु हत्ती, संकेत गावडे, मृदुला वडर आदी गुणवंतांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंदअण्णा कित्तुरकर, मुख्याध्यापक विलास शिंदे, डॉ. प्रा. सुनील देसाई, अनिता चौगुले, प्राचार्य. डॉ. सुधाकर शिंदे, ए. डी. तंगडे, सी. एस. मठपती, तसेच शिक्षक, पालक विद्यार्थी यांची उपस्थिती होती. सुहास पुजारी, संपत सावंत यांनी सूत्रसंचालन केले. इराप्पा मरडी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी गावातील भोंगळ कारभार लपवण्याच्या उद्देशाने गावसभा टाळणारी महिला सरपंच अपात्र

Spread the love  गेल्या वर्षभरापासून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *