पन्नास महिला महाआरतीत सहभागी
चंदगड (रवी पाटील) : सार्वजनिक दुर्गा देवी नवरात्र उत्सव व ग्रामस्थ मंडळ कुर्तनवाडी येथे सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्र उत्सव सलग ७ व्या वर्ष सूरू असून यावर्षी सन २०२२-२३ सालात नवरात्रीच्या ७ व्या दिवशी मंडळातर्फे गावातील ५० महिलांना नवरात्र महाआरती महोत्सवचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाआरती नंतर गावातील प्रगतशील शेतकरी व माजी ग्रामपंचायत सदस्य ह.भ.प. श्री. अशोक शंकर चांदेकर यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला.
नवरात्र उत्सव मंडळातर्फे नवनवीन उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, दीपोत्सव, हळदी कुंकू, महिलांचा झिम्मा फुगडी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच समाज प्रबोधनासाठी किर्तन, प्रवचन, भजन असे आयोजन केले होते. यावर्षी माधुरी फिल्म कोल्हापूर यांच्या मोठ्या पडद्यावरील साडेतीन शक्तीपीठ देवीचा महिमा, सती अनुसया हा कार्यक्रम दाखविण्यात आला.
यावर्षाची मुहूर्तमेढ एकनाथ धाकलू चांदेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. देवीच्या मिरवणुकी पासून देवीच्या विसर्जन मिरवणूकीपर्यंत गावातील लहान मुले-मुली, महिला,वयोवृद्ध, भजनी मंडळ दिंडीमधे सहभागी होते.