चंदगड : आज संपर्क प्रमुख मा. श्री. उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड येथील रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत चंदगड शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. युवासेना शहर अध्यक्ष म्हणून श्री. गणेश चव्हाण यांची निवड करण्यात आली. युवासेना उपशहर प्रमुख म्हणून श्री. सुरज सुभेदार यांची निवड करण्यात आली. महिला शहर अध्यक्ष म्हणून सौ. दुर्वा पेडणेकर यांची निवड करण्यात आली. महिला उपशहर प्रमुख म्हणून सौ. स्नेहल खोचरे यांची निवड करण्यात आली व महिला संघटीका म्हणून सौ. स्वरा ओऊळकर यांची निवड करण्यात आली सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नावे तालुका प्रमुख श्री. कल्लाप्पान्ना निवगीरे यांनी जाहीर करून त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करावे असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात उपतालुका प्रमुख श्री. दत्ता पाटील, तुलशिदास जोशी, मिथुन पाटील, ताजुदीन मंगसुळी, संजय पाटील, बाबु नेसरकर, मारूती पाथरूट, मनोहर पाटील, सलमान शेख, ताहीर शेख, महिला उपजिल्हा संघटीका सौ. भारती शेडगे, सौ. आर्चना आनंदाचे, महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते. आभार तुलशिदास जोशी यांनी मानले.