शिनोळी : उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रभाकर खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट व निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करून आम्ही सगळे पक्षप्रमुख मा श्री. ऊद्धव ठाकरे यांच्यासोबत चंदगड तालुका पूर्णपणे उभा असल्याचे सांगितले.
शिंदे गटाने कितीही दबाव व आमिषे दाखवली तरी तालुक्यातील लोक त्याला बळी पडणार नाहीत व येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना चितपट केल्याशिवाय जनता जनार्दन शांत राहणार नाही याची ग्वाही देऊन शिवसेना पक्ष पुन्हा नव्या जोमाने उभा करू व महाराष्ट्रात पुन्हा आपली सत्ता आणू असे सांगितले..
यावेळी तालुका प्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांनी काल जो केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला तो लोकशाहीला काळीमा फासणारा व हुकुमशाहीला प्रोत्साहन देणारा होता. जरी पक्षचिन्ह व पक्ष त्यांना दिला तरी बाळासाहेब व उद्धवसाहेब यांच्या पाठीशी महाराष्ट्राची संपुर्ण जनता खंबीरपणे उभी राहिल अशी आशा व्यक्त करून या शिंदे गट व निवडणुक आयोगाचा जाहीर निषेध व्यक्त केला.
उपजिल्हाप्रमुख श्री. प्रभाकर खांडेकर साहेब, तालुका प्रमुख श्री. लक्ष्मण मनवाडकर, उपतालुका प्रमुख श्री. विनोद पाटील, विभाग प्रमुख संदीप पाटील, मांडेदुर्ग शाखाप्रमुख विजय भोगण, तेऊरवाडी शाखाप्रमुख मारुती कांबळे, युवासेना उपतालुकाप्रमुख अवधूत भुजबळ, सुरुते शाखाप्रमुख हणमंत भोंगाळे, बांधकाम कामगार अध्यक्ष उमाजी पवार, वरिष्ठ शिवसैनिक गुंडू भाटे, बांधकाम कामगार संघटना उपतालुकाप्रमुख विलास बिरजे, दुंडगे शाखाप्रमुख मारुती पाटील, युवासेना विभागप्रमुख सम्राट पाटील, नागरदळे शाखाप्रमुख परशराम मुरकुटे, संदीप ढोलके, मनोहर चौगुले, धाकलु भाटे, दत्तू भाटे, लखन कांबळे, मारुती कांबळे, संदीप पाटील, शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.