केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन…!
चंदगड : राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चंदगड विधानसभेचे भाजपचे नेते शिवाजी पाटील यांच्या सहकार्याने चंदगड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.
या आरोग्य शिबिरात बालरोग, स्त्री रोग, जनरल तपासणी, हाडांचे विकार, इसीजी, मोफत औषधे वाटप, नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. समरजितसिंग घाटगे, माजी मंत्री श्री. भरमु अण्णा पाटील, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राम राऊत, बेळगावचे माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्राचार्य आनंद आपटेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम उपस्थित होती.
Belgaum Varta Belgaum Varta