Sunday , December 7 2025
Breaking News

शिनोळी रा. शाहू विद्यालयाला माजी विद्यार्थांच्याकडून पिण्याच्या पाण्याची टाकी भेटवस्तू

Spread the love

 

चंदगड : शिनोळी बु. येथील ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. या विद्यालयातील तसेच शिक्षणप्रेमी व क्रिकेटपटू यांनी शाळेला पिण्याची पाण्याची टाकी भेटवस्तू म्हणून भेट दिली.

गावमर्यादित नुकत्याच क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये उपविजयता हनुमान इलेव्हन संघ यांनी रु. 3000 चे बक्षिस मिळाले. ते बक्षिस आपल्या गावातील हायस्कूलमध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी देण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपत या विद्यार्थांनी भेटवस्तू स्वरूपात देणगी दिली.

यावेळी मुख्याध्यापक एन. टी. भाटे व सहा. शिक्षक रवी पाटील, सदा पाटील व सुभाष कदम उपस्थित होते. सदर टाकी देण्यासाठी सरपंच सोपान पाटील व विनोद पाटील यांनी प्रयत्न केले.

मुख्याध्यापक एन. टी. भाटे, रवी पाटील, एस. बी. कदम व विक्रम तुडयेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच सोपान पाटील, सेवा सोसायटी चेअरमन विनोद पाटील, नंदकुमार बामूचे, अमोल देवण, परशराम बेळगावकर, वेदांत बेळगावकर, रोहन पाटील, लखन रेमाणाचे, रोशन पाटील, भक्तिराज मेणसे, किरण बामुचे, रवी मेणसे यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

Spread the love  चंदगड : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *