Wednesday , March 4 2026
Breaking News

प्रा. नागेंद्र जाधव करणार बेमुदत धरणे आंदोलन…

Spread the love

शिनोळी : श्री वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेमणुकीत प. महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दि. २८ ऑगस्ट २०२३ पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायत देवरवाडी यांनी ग्रामसभा घेऊन श्री वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती गठित केली होती. मात्र त्यातील प्रा. नागेंद्र जाधव यांच्या नावाला कोणतेही कारण न देता प. महाराष्ट्र देवस्थान समितीने वगळले होते. त्याबाबत त्यांनी गेली चार महिने संबंधित कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय वारंवार विनंती अर्ज करून ही त्याची कोणतीच दखल देवस्थान समितीने घेतली नसल्याने व जाणीवपूर्वक त्यांच्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ जोपर्यत त्यांना न्याय मिळणार नाही व श्री वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीत सदस्य पदी नियुक्ती होत नाही तोपर्यंत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *