Sunday , July 26 2026
Breaking News

प्रभू यत्नट्टी यांना दिलासा; सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून स्थगिती

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची कायमस्वरूपी सनद रद्द करण्याच्या राज्य बार कौन्सिलच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे अशी माहिती वकील यत्नट्टी यांनी ‘बेळगाव वार्ता’शी बोलताना दिली आहे.

मागील काही दिवसापूर्वी कर्नाटक बार कौन्सिलने बेळगाव बार असोसियएशनचे तत्कालीन अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांची वकिलीची सनद कायमस्वरुपी रद्द करावी असा आदेश दिला होता. त्यानंतर यत्नट्टी यांना बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्याविरोधात त्यांनी राज्य कौन्सिलच्या आदेशावर दिल्लीत बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागितली होती त्यावर बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे.

या स्थगितीच्या आदेशामुळे आगामी काळात प्रभू यत्नट्टी हे पुन्हा बेळगाव बार असोसिएशन अध्यक्ष पदी रुजू होणार आहेत.

सोमवारी सायंकाळी बार कौन्सिल ऑफ इंडियाने प्रभू यत्नट्टी यांना दिलासा दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी बेळगाव कोर्ट परिसरात फटाक्याची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *