Tuesday , September 17 2024
Breaking News

राजकारण्यांचे वर्षानुवर्षे मराठा समाजाकडे दुर्लक्ष; सुुरेश सातवणेकर

Spread the love

 

चंदगड (प्रतिनिधी) : आरक्षणाच्या प्रश्नावरही राजकीय नेत्यांचे एकमत झाले नाही, त्यामुळेच विशाल प्रमाणात असलेल्या मराठा समाजाचे आजपर्यंत सर्वच बाजुने नुकसान होत आहे. सत्तेपूर्वी दिलेल्या अश्वासनांचा सत्तेवर आल्यानंतर राजकीय लोकांना त्याचा विसर पडतो, त्यामुळेच वर्षानुवर्षे मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले आहे, असे प्रतिपादन चंदगड तालुका मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सुुरेश सातवणेकर यांनी केले. ते चंदगड येथे आयोजित मराठा
समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.
अध्यक्षस्थानी डाॅ. आर. एन. गावडे होते.
प्रारंंभी प्रास्ताविक कमलाकर सावंत यांनी करून मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी या मेळाव्याचे आयोजन असल्याचे सांगितले.

श्री.सातवणेकर पुढे म्हणाले, मराठा समाजाकडे आर्थिक ताकद नसल्याने समाजाचे खच्चीकरण झाले. त्यामुळे आर्थिक विकास होत नाही. आम्ही कोणत्याही समाजाची उणी-दुणी काढत नाही. पण आम्हाला कुणी डिवचण्याचे काम केले तर त्याला सोडणार नाही, असा इशारा देऊन आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून चंदगड अर्बन बँकेच्या सहकार्याने चंदगड तालुक्यातील १५० तरूणांना रोजगार दिल्याचे सांगितले. यावेळी मराठा समाजाचे संघटक शंकर मनवाडकर यांनी शासनाने आजपर्यंत मराठा समाजाची फसवणूक केली आहे. शासकीय स्तरावर फक्त ६ टक्के लोक नोकरीत आहेत, ३७ टक्के जनता गरीबावस्थेत आहेत. तर २२ टक्के मराठा समाज भूमिहीन आहेत. पण प्रत्येक निवडणुकीत मराठा समाजाचे पाठबळ घेऊन निवडून सत्तेत उपभोग घेण्यार्या सत्ताधाऱ्यांना मराठा समाजाचे प्रश्न मात्र सोडवण्यास मात्र वेळ मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचे सांगितले. तर उद्योजक महादेव वांद्रे यानी चंदगड शहराच्या विकासाठी व मराठा समाजाच्या हक्कासाठी मराठा समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी मराठा समाजाचे तालुका सरचिटणीस राजाराम सुकये यानी मेळाव्याचा हेतू स्पष्ट करून मराठा समाज स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून ५० टक्क्याच्या आतील टिकाऊ आरक्षण मिळाले पाहिजेत. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फि शासनाने भरली पाहिजे. आरक्षण देताना जातीच्या टक्केवारीनुसार आरक्षण मिळाले पाहिजे. आण्णासाहेब पाटील महामंडळाने मराठा समाजातील शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी ट्रॅक्टर योजना व विद्यार्थीसाठी ४० लाखापर्यतचे शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली आहे, मात्र या शासनाने अद्याप या योजनाचा आद्यादेश काढला नाही. तो अध्यादेश काढावा. मराठा समाजासाठी राबवलेल्या योजना व आरक्षणासाठी काय प्रयत्न केले याची श्वेतपत्रिका काढावी, असे ठराव यावेळी मांडण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाने एकमुखी पाठिंबा देऊन ठराव संमत केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ. गावडे यांनी मराठा हा कष्टकरी आहे, त्याचे नाते माती आणि मिल्ट्रीशी आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा आहे, म्हणून त्याने धन्यता मानली आहे. पण यापूढे मराठा समाजाला सरकार दरबारी न्याय मिळाला पाहिजे, असे सांगून “एक मराठा… एक लाख मराठा” या घोषणेने मराठा समाज बांधून ठेवला असल्याचे सांगितले.

यावेळी ओंकार चंदगडकर, दिलीप कदम, विक्रम मुतकेकर, नितीन गायचारे, ॲड.विजय कडुकर, सुधाकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक अभिजीत गूरबे, नितेश मोरे, अजय कदम, ज्ञानेश्वर चंदगडकर, रमेश देसाई, शांताराम भिंगुर्डे, सुभाष गावडे, नितीन मोरे, संतोष देसाई, महेश देसाई, एकनाथ म्हडगुत, नंदकुमार ढेरे, मारूती पाऊसकर, पिंटू कडोलकर, ह्रषिकेश कुट्रे, परशुराम बांदिवडेकर, आदीसह
मराठा युवक-युवती मोठ्या संख्येेेने उपस्थित होते. सुत्रसंचलन विश्वास पाटील यांनी केले, तर आभार संजय तारळेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

शिनोळी येथे ‘स्पर्धा परीक्षांचा दृष्टीकोन शालेय जीवनात कसा वाढवावा’ या विषयावर प्रा. जॉर्ज क्रूझ यांचे सखोल मार्गदर्शन

Spread the love  शिनोळी (रवी पाटील) : शिनोळी येथील समाज मंदिर येथे ‘शालेय जीवनापासून स्पर्धा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *