Sunday , September 20 2026
Breaking News

कॅम्प परिसरात किरकोळ वादातून एकाचा खून

Spread the love

 

बेळगाव : कॅम्प परिसरात किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याची घटना रविवारी घडली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून दोघा सख्ख्या भावांनी एका युवकाचा खून केला. ॲरिकस्वामी अलेक्झांडर अँथोनी (वय २५, रा. अँथोनी स्ट्रीट, कॅम्प) असे मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत ॲरिकस्वामी व खुनातील संशयित एकाच परिसरात राहतात. शनिवारी रात्री या प्रकरणातील अल्पवयीन युवक रस्त्यावर विनाकारण शिव्या देत थांबला होता. रस्त्याने जाणाऱ्या एकाने त्याला हटकून, ‘उगीचच का शिव्या देत थांबला आहेस घरी जा’, असे सांगितले. यानंतरही तो शिव्या देतच होता. नेमक्या ॲरिकस्वामीच्या घराजवळच हा प्रकार सुरू होता. त्यावेळी ॲरिकस्वामी घरात जेवत होता. घरासमोरच थांबून सदर युवक शिवीगाळ करत असल्याने तो बाहेर आला आणि अशी विनाकारण का शिवीगाळ करतोस निघ इथून, असे सांगून तो पुन्हा घरात गेला. ॲरिकस्वामीला बाहेर बोलावून घेत माझ्या घेत भावाला का ओरडलास, असे म्हणत पुन्हा वाद घातला. यातून एकमेकांच्या अंगावर धावून जात मारबडव सुरू झाली. यावेळी धाकट्या भावाने ॲरिकस्वामीला ढकलले. तो गटारीत जाऊन पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाल्यानंतर दोघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोघांपैकी एक भाऊ अल्पवयीन आहे. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास अँथोनी स्ट्रीट, कॅम्प येथे ही घटना घडली.
कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन युवकासह दोघा भावांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता अल्पवयीन युवकाची बालसुधारगृहात तर १८ वर्षाच्या भावाची कारागृहात रवानगी केली. कॅम्पचे पोलिस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *