Sunday , December 7 2025
Breaking News

श्रीराम विद्यामंदीर शिनोळी खुर्द येथे नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

Spread the love

 

शिनोळी (रवी पाटील) : श्रीराम विद्यामंदीर शिनोळी खुर्द येथील नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच परशराम निंगाप्पा पाटील होते.

नूतन इमारत लोकार्पणाचा उदघाटक रोजगार हमी योजना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते पूजन व फित कापून करण्यात आले. कोनशिला उद्घाटन दिपकराव भरमूआण्णा पाटील, मायाप्पा पाटील व प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा नियोजन फंडातून ३ वर्गांसाठी ३० लाख रुपये व खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून सुशोभिकरणासाठी ५ लाख रुपये मंजूर झाले. हे सर्व रोजगार हमी योजना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील व प्रतापराव सुर्यवंशी यांच्या प्रयत्नातून साकारले.

कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या ईशस्तवन्याने करण्यात आली. यावेळी दीपप्रज्वलन रामलिंग पाटील, शिवाजी खांडेकर, एम. एन. पाटील, भैरू खांडेकर, दत्ता पाटील व प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती प्रतिमा पूजन ज्योतीताई दीपक पाटील व रूपा भैरू खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी केले.

स्वागताध्यक्ष म्हणून शिवसेना कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख उबाठा गटाचे प्रभाकर खांडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

इमारतीचे बांधकाम ठेकेदार प्रतापराव सूर्यवंशी, अशोक कदम (कलिवडे), अभिषेक सूर्यवंशी व सोमनाथ शिंदे यांचा माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. प्रतापराव सूर्यवंशी, अशोक कदम (कलिवडे) यांचा गव्ह. कॉन्ट्रॅक्टर प्रवीण पाटील व ओमकार ट्रेडर्सचे दत्ता पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने बांधकाम ठेकेदारांचा शाल, बुके व शिवमूर्ती देवून सन्मान केला.

माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील म्हणाले, “श्रीराम विद्यामंदीर शिनोळी खुर्द येथील नवीन इमारत शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी एक उत्तम सुविधा ठरेल. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक वातावरणात शिक्षण घेता येईल.तसेच त्यांनी शाळेच्या व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थ्यांचे आणि ग्रामस्थांचे कौतुक केले. “शाळेच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न हे खरंच स्तुत्य आहेत. इथल्या विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठ्या यशाची शिखरे गाठावीत, हीच माझी शुभेच्छा आहे,” असे त्यांनी म्हटले.

शाळेच्या नूतन इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या नव्या इमारतीच्या उद्घाटनाने शाळेच्या विकासात नवा अध्याय सुरू झाला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी प्रतापराव सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते एम. एन. पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटील, धनंजय महाडिक, युवा शक्तीचे अध्यक्ष मायापा पाटील, माजी सभापती यशवंत सोनार, माजी सभापती शांताराम बापू पाटील यांची मनोगते व्यक्त झाली.

कार्यक्रमात मान्यवर म्हणून उदयकुमार देशपांडे, तुकाराम बेनके, महिपाळगडचे माजी सरपंच रमेश भोसले, वामन खांडेकर, गोकुळ दूधचे माजी संचालक दिपकराव पाटील, महिला बालकल्याणच्या माजी सभापती ज्योतीताई पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कृष्णा पाटील , पंचायत समितीच्या माजी सदस्या रूपा खांडेकर, भैरू खांडेकर, शिनोळी बुद्रुकचे सरपंच गणपत कांबळे व उपसरपंच पुंडलिक गवसेकर, नारायण तातोबा पाटील, कृष्णा बोकमूरकर, भरमू आपटेकर सुरुते ,जोतिबा तुडयेकर, डॉ बाबू पाटील , प्रशांत पाटील , रामचंद्र तरवाळ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पाटील सर यांनी केले तर आभारप्रदर्शन हंबीरराव कदम यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

Spread the love  चंदगड : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *