नेसरी : आज देशभर आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. 800 वर्षापासून दिंडीची परंपरा चालत आलेली असून आषाढी एकादशी म्हणूजे विठ्ठल भक्तांसाठी पर्वणीच. पंढरपूर येथे आज विठ्ठल दर्शनासाठी गर्दीचा महासागर लोटला असून गावोगावी पण मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जाते, त्या निमित्ताने नेसरी येथील श्री व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईची पालखी खांद्यावर घेत, भगव्या पताका, वारकरी पेहराव परिधान करून विठू नामाचा जयघोष करत गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी विठ्ठल मंदिर येथे पोहोचले तेथे रिंगण सोहळा साजरा केला व पुढे बस स्थानकापासून दिंडीची सांगता करण्यात आली. या दिंडीचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष भिकाजी दळवी, अध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने केले होते.