चंदगड : निवडणूक लढवण्यासाठी सेवा संस्था, दूध संस्था घराणेशाही यांचे पाठबळ लागते, पण माझ्याकडे काहीच नसताना माझ्यावर विश्वास दाखवला. मतदार संघाच्या विकासासाठी आपण मला पुन्हा एकदा संधी द्यावी, मतदार संघाचा कायापालट करू असे आश्वासन भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी दिले.
आगामी विधानसभा निवडणूक पक्ष किंवा अपक्ष निवडणूक लढवणारच आणि पुन्हा एकदा मला संधी द्यावी असे भावनिक आवाहन भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी केले. कार्वे येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना भरमुअण्णा म्हणाले, “जनसेवा करण्याची संधी मिळत नाही ती करण्याचे भाग्य रक्तात लागते. यापुढे हि शिवाजीराव यांच्याकडून लोकसेवा घडो तसेच चांगल्या कामात ठामपणे पाठीशी उभे राहू अशा शुभेच्छा देत, चंदगडचे दुखणे पहायला येणाऱ्यानो कोल्हापूरचा महापूर आवरा चंदगडचा विकास करायला आम्ही समर्थ आहोत” असा टोला माजी राज्यमंत्री पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. त्याचबरोबर ज्योती पाटील यांनी शिवाजी पाटलांच्या चांगल्या कामात ठामपणे पाठीशी उभे राहू अशा शुभेच्छा दिल्या.
डॉ. नंदाताई बाभुळकर, अशोक चराटी यांनीही शुभेच्छा दिल्या.
यावेळी नामदेव पाटील, शांताराम पाटील, सचिन बल्लाळ, संतोष तेली, विठाबाई मुरकुटे, मनीषा शिवणगेकर, रत्नप्रभा देसाई, दीपक पाटील, यशवंत सोनार, मोहन परब, सुरेश सातवणेकर, विजय भोसुरे, दत्तात्रय शिंदे, रवी बांदिवडेकर, जानबा कांबळे, लक्ष्मण गावडे, ऋषिकेश कुट्रे, विठ्ठल पाटील, विजय शिंदे, राजेश पाटील, राजु मिरजे, प्रीतम कापसे, अशोक कदम, भावकू गुरव, ऍड. विजय कडुकर, सुनील काणेकर, प्रताप सूर्यवंशी, सुधा नेसरीकर त्याच बरोबर प्रा. आनंद आपटेकर हेही उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीशैल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनिल शिवणगेकर यांनी केले तर आभार मायाप्पा पाटील यांनी मानले.