चंदगड : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निस्वार्थीपणे संघर्ष करणाऱ्या मनोजदादांविषयी मला पहिल्यापासूनच प्रचंड आदर आहे. ते मोठ्या संयमाने आणि परखडपणे मराठा समाजाची बाजु मांडत मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. त्यांच्या या प्रमाणित हेतूमुळेच आज लाखो मराठा बांधव त्यांच्यावर विश्वास ठेवून या मराठा आरक्षणाच्या लढाईत सामील झाले आहेत. मनोज दादांच्या मागण्या रास्तच आहेत आणि माझाही त्यांना पाठिंबाच आहे. त्यांनी मला कोणत्याही प्रकारची जबाबदारी द्यावी आणि एक मराठा समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ती जबाबदारी पुर्ण करेन. शासनानेही या लढ्याची दखल घेतली आहे. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यावर सकारात्मक तोडगा काढतील असा आम्हांला विश्वास आहे.” मराठा आरक्षणासाठी आलेल्या मराठा बांधवांना कुठेही जेवण, पाणी किंवा वैद्यकीय मदत लागली तरी मी ती करण्यासाठी तत्पर आहे, मला मराठा बांधवांनी संपर्क करावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाची ही लढाई आता आरपारची आहे आणि मराठा आता मागे हटणार नाही याची सरकारनेही दखल घ्यावी.









Belgaum Varta Belgaum Varta