चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी वरिष्ठ अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हापूर यांच्याकडे चंदगड येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा व्हावी यांकरिता मागणी केली आहे.
चंदगड तालुक्यांमधे राष्ट्रीयकृत बँकची कमतरता असून भागांतील नागरिकांची गैरसोय होत आहे. बँक ऑफ इंडिया ही केवळ एकच राष्ट्रीयकृत बँक येथे असून अन्य राष्ट्रीयकृत बँकेची आवश्यकता भासत आहे. लोकसंख्येच्या मानाने व ईतर कित्येक गावे ही एकाच बँकेवर म्हणजे बँक ऑफ इंडिया चंदगड शाखेवर अवलंबून रहावे लागते आहे. त्यामुळे येथे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. शासकीय बँक एकच असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे व्यवहार याच बँकेतून होत असतात. त्यामुळे एकंदरीत एकच राष्ट्रीयकृत शासकीय बँक असल्याने नागरिकांची गैरसोय टाळावी व स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा व्हावी यांसाठी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी जयसिंग पाटील, कलीम मदार, अमोल कुंभार, जितेंद्र पाटील उपस्थित होते.