चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : ई-पीक पाहणी, शिवार फेरीअंतर्गत कृषी विभाग व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून अलबादेवी येथे कार्यक्रम संपन्न झाला. शेतकरी स्वावलंबी व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे कृषी विभाग तसेच ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या नवनवीन योजनेंचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे मत कृषी सहायक अधिकारी अनिल कुटे यांनी सदर आयोजित कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.
यावेळी ग्रामसेविका सुवर्णा वळवी, सरपंच रेखा देवळी, उपसरपंच राजाराम पाडले, माजी उपसरपंच गुरुनाथ देवळी, श्रीकांत नेवगे, शिवाजी पाटील, पांडुरंग पवार, सचिन पाटीलसह आदी शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta